महाराष्ट्र

एकनाथ खडसे यांना मोठा धक्का ; जावयाला ईडीकडून अटक

मुंबई : पूर्वीचे भाजपचे आणि आतचे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचे जावई गिरीश चौधरी girish chaudhari यांना पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी ईडीकडून अटक करण्यात आली आहे. ही अटक म्हणजे एकनाथ खडसे यांना मोठा धक्का मानला जात आहे. Big blow to Eknath Khadse; Son-in-law arrested by ED

मंगळवारी चौधरी यांची  मनी लाँड्रिंग प्रकरणात 13 तास ईडीकडून कसून चौकशी करण्यात आल्यानंतर त्यांना रात्री अटक करण्यात आली आहे.

राष्ट्रवादीत प्रवेश करताना माझ्या मागे ईडी लावण्याचा प्रकार चालू असून त्यांनी ईडी लावली तर मी सिडी लावेन असा इशारा खडसे यांनी दिला होता. आता जावयाल अटक झाल्यानंतर खडसे कोणती भूमिका घेणारं हे पाहावे लागणार आहे. भोसरी भूखंड प्रकरणात एकनाथ खडसे यांची जानेवारी महिन्यात ईडीने चौकशी केली होती.

Img 20210701 wa0256

महसूल मंत्री खडसे यांनी पुण्यातील भोसरी येथे 3.1 एकर एमआयडीसी प्लॉट खरेदी करण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप 2016 मध्ये झाला होता. 31 कोटी रुपयांची किंमत असलेल्या या भूखंडाची निव्वळ 3.7 कोटी रुपयांना विक्री झाल्याचा दावा केला गेला होता. रेडी रेकनर दरापेक्षा खूपच कमी बाजारमूल्य दाखवून जमिनीची खरेदी झाल्याचा आरोप आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये