केंद्र सरकारकडून पुण्याला थेट अडीच लाख कोरोना लसींचा पुरवठा महापौर मोहोळ यांची माहिती

पुणे : केंद्र सरकारकडून पुण्याला रातोरात जवळपास अडीच लाख कोरोना लसीच्या डोसची व्यवस्था करुन दिली. तर आज आणखी सव्वालाख डोस पुण्यासाठी उपलब्ध होतील. कोरोना लसींचा तुटवडा जाणवू लागल्यानंतर तातडीनं लस पुरवठा केल्याबद्दल पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विटरच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. According to Mayor Mohol, the Central Government has supplied 2.5 lakh corona vaccines directly to Pune
सर्वाधिक सक्रिय रुग्ण असणाऱ्या पुण्याचा अधिक लसींची गरज आहे, यात कुणाचंही दुमत नाही. पण, त्यातच मुंबई आणि इतर शहरांमध्येही कोरोनाग्रस्तांची संख्या वेगानं वाढत असताना लस पुरवठ्याच्या बाबतीत पुण्याला प्राधान्य देत केंद्रानं दुजाभाव केला आहे का, असा सवाल महापौर मोहोळ यांच्या ट्विटर पोस्टनंतर उपस्थित केला गेला.
धन्यवाद, @narendramodi सरकार !
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) April 9, 2021
केंद्र सरकारकडून पुणे जिल्ह्याला कोरोना लसीचा थेट पुरवठा सुरू झाला असून आज जिल्ह्यासाठी २ लाख ४८ हजार लस प्राप्त झाल्या आहेत. तर रविवारी १ लाख २५ हजार लस मिळणार आहेत. यात शहराला ४०%, ग्रामीणला ४० % आणि पिंपरी-चिंचवडला २०% टक्के लस मिळणार आहेत.







