पुणेकरांना दिलासा, सोमवारपासून मॉल्स उघडणार, दुकानं रात्री 7 वाजेपर्यंत खुली राहणार

आषाढी वारी यंदाही बसमधूनच
पुणे : पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. सोमवारपासून (14 जून) पुण्यातील मॉल उघडण्यास आणि सर्व दुकाने रात्री सात वाजेपर्यंत खुली ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. हॉटेल , रेस्टॉरंट रात्री दहा वाजेपर्यंत खुले करण्यास परवानगी देण्यात आली आहे. अजित पवार यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.(Consolation to Pune residents, malls will be open from Monday, shops will be open till 7 pm)

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुणेकरांना मोठा दिलासा दिला आहे. सोमवारपासून (14 जून) पुण्यातील मॉल्स उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर सर्व दुकानं रात्री सात वाजेपर्यंत खुली राहतील. याशिवाय सोमवारपासून अभ्यासिका, वाचनालय सुरु करण्यास देखील परवानगी देण्यात आली आहे. पुण्याचा पॉझिटिव्हिटी रेट पाचच्या खाली आला प्रशासन लगेच निर्बंध बदलेल. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असंही अजित पवार यांनी सांगितलं.
अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यातील कौन्सिल हॉल इथे कोरोना आढावा बैठक पार पडली. या बैठकीला प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते. शहर अनलॉक केल्यानंतर ही पहिली बैठक होती. रुग्ण संख्येची परिस्थिती बघून आणखी शिथिलता देणार की निर्बंध कठोर केले जाणार याकडे लक्ष लागलं होतं. या बैठकीनंतर पुणेकरांना निर्बंधांमध्ये आणखी शिथिलता मिळाली आहे



आषाढी वारी यंदाही बसमधूनच
राज्यातील ज्या मानाच्या दहा महत्त्वाच्या पालख्या आहेत, त्यांनाच आषाढीच्या वारीसाठी परवानगी देण्यात आली आहे. या पालख्यांना बसमधून जाण्याची परवानगी देण्यात आली असून त्यांना 20 बसेस देण्यात येणार आहेत. तसा निर्णयच कॅबिनेटमध्ये घेण्यात आला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आषाढी वारीसाठी पालख्यांना परवानगी देण्याबाबत एक समिती स्थापन करण्यात आली होती. त्यांची काल बैठक झाली असून त्यांनी राज्य सरकारला अहवाल दिला आहे. त्यानंतर काल राज्याची कॅबिनेटची बैठक पार पडली. त्यात आषाढी वारीसाठी महत्त्वाच्या मानाच्या सर्व दहा पालख्यांना बसमधून जाण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला, असं पवार म्हणाले.



