वारजेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात संविधान दिन उत्साहात साजरा..

वारजे: वारजे मधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक नामफलकाला पुष्पहार अर्पण करून उपस्थितांकडून अभिवादन करण्यात आले.
यावेळी भारतीय संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. परिवर्तन विचार मंच अध्यक्ष ललित इंगळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नामकरण समिती व बौद्ध धम्म परिषद खडकवासला यांच्या वतीने संविधान दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी माजी उपमहापौर दिलीप भाऊ बराटे, माजी नगरसेवक शिवराम मेंगडे, माजी नगरसेवक, शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष बाबा धुमाळ, माजी नगरसेवक राजाभाऊ बराटे, माजी नगरसेवक सुशील मेंगडे, राष्ट्रवादी काँग्रेस कोथरूड विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष स्वप्निल दुधाने, पिडीसीसी बँकचे संचालक प्रवीण शिंदे,
महाराष्ट्र प्रदेश रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया वरिष्ठ उपाध्यक्ष संगीता आठवले, माजी पंचायत समिती सदस्य दिलीप कदम आदी उपस्थित होते.









