महाराष्ट्र

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण..

मुंबई : शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण झाली आहे. वर्षा गायकवाड यांनी ट्विट करून आपली कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असल्याची माहिती दिली. यासोबतच त्यांनी आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना देखील खबरदारी घेण्याची विनंती केली असून आपली प्रकृती उत्तम असल्याचे म्हटले आहे.

संध्याकाळी काही प्राथमिक लक्षणं जाणवल्यानंतर माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझी लक्षणं तुलनेने सौम्य आहेत. मी आता ठीक आहे आणि मी स्वतःला आयसोलेट केले आहे. गेल्या काही दिवसांपासून जे मला भेटले त्यांनी खबरदारी घ्यावी अशी मी विनंती करते, असे म्हटले आहे.

हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या कामकाजात सहभागी होण्यासाठी अनिवार्य करण्यात आलेल्या आरटीपीसीआर चाचणीत तब्बल ३५ लोकांना कोरोना बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यामध्ये मंत्री के. सी. पाडवी, तीन पत्रकार, पोलीस कर्मचारी, विधिमंडळ आणि मंत्रालयातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

Screenshot 20211227 1402344603556305344739789

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये