पुणे शहर

पुणे महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांच्याकडून २०२१- २२ वर्षासाठी  ७ हजार ६५० कोटींचे रुपयांचे अंदाजपत्रक  सादर

पुणे : आयुक्त विक्रम कुमार यांनी आज पुणे महानगरपालिका स्थायी समिती समोर सन २०२१-२०२२ आर्थिक वर्षासाठीचे  ७ हजार ६५० कोटींचे रुपयांचे अंदाजपत्रक मान्यतेसाठी सादर केले. Pune Municipal Commissioner Vikram Kumar presents budget of Rs 7,650 crore for 2021-22 years

यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, सभागृहनेते गणेश बीडकर, उपमहापौर सरस्वती शेंडगे, विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, आबा बागुल, उपयुक्त रुबल अग्रवाल उपस्थित होते.

जुन्या प्रकल्पांना गती देणे व विकासाचे मॉडेल मजबूत करण्यासाठी आंदाजपत्रकात नियोजन करण्यात आले असले तरी पालिकेच्या तिजोरीत खडखडाट असताना अंदाजपत्रकात मात्र कोटीच्याकोटी उड्डाणे घेण्यात आली असल्याने आकडे फुगवण्यात आल्याची चर्चा केली जात आहे.

आयुक्त विक्रम कुमार यांनी आपले पहिलेच आंदाजपत्रक आज सादर केले. शहरातील पायाभूत सुविधा वाढविणे, प्रमुख 20 रस्ते पीपीपी मॉडेलद्वारे विकसित करणे, येरवड्यात वाहतूक उद्यान उभारणे, घनकचरा, पाणी पुरवठा, इलेक्ट्रिक बस खरेदी, दहा किलोमीटरचे सायकल ट्रॅक तयार करणे आदीसाठी तरतूद केली आहे. यातील काही कामांना शासनाचे अनुदान मिळणार असले तरी उरलेल्या कामांना निधी देताना पालिकेची आवस्था खराब होणार असल्याचे जाणकार बोलत आहेत.

आंदाजपत्रकात नदी सुधार प्रकल्पावर भर देण्यात आला असून त्यासाठी १५० कोटीची तरतूद करण्यात आली आहे.  या आगोदरही अनेकवेळा नदी सुधारण्यासाठी निधी देण्यात आला असला तरी नदी सुधार झाला का असा आजही अनेकांना प्रश्न पडला आहे.

Img 20210116 wa0007

यासोबतच 11 गावांचा विकास आराखडा तयार केला जाणार आहे. यासोबतच शहराच्या भोवतीने नव्याने तीन टिपी स्कीम राबविण्यात येणार आहेत. या अंदाजपत्रकात पालिकेच्या उत्पन्नाचा भार मिळकत कर वसुलीवर आहे. त्यानुसार मिळकत कर 2356 कोटी, जीएसटीमधून दोन हजार कोटी, बांधकाम परवान्यातून 980 कोटी आणि पाणीपट्टीतून 500 कोटी रुपयांचे ठळक उत्पन्न अपेक्षित असल्याचे मत आयुक्त कुमार यांनी व्यक्त केले आहे.


Img 20210128 wa0172

भारतरत्न अटल बिहारी वैद्यकीय महाविद्यालयाची उभारणी व जूनपासून प्रवेश प्रक्रिया, झोपडपट्टीमुक्त शहरासाठी पंतप्रधान आवास योजना पीपीपी तत्त्वावर राबविणार, नवीन लाईट हाऊस तयार करणे, डिजिटल लिटरसीवर भर देणार, रोजगार निर्मितीसाठी अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्र उभारणार, मुळा मुठा नदी सुधार योजनेअंतर्गत जायका प्रकल्पातंर्गत जलशुद्धीकरण केंद्र उभारणार, टेक स्टॅर्टअप पार्क उभारणीसाठी निधी,
नियमित कर भरणाऱ्यांसाठी लॉयल्टी स्कीमआणणार असे ठळक मुद्दे आज सादर केलेल्या अंदाजपत्रकात आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये