कर्वेनगरमधील सम्राट अशोक विद्यालयात कोरोना लसीकरण केंद्र सुरू

पुणे : पुणे महापालिका प्रशासनाच्यावतीने सम्राट अशोक विद्यालय भैरवनाथ मंदिर जवळ , कर्वेनगर गावठाण, या ठिकाणी गुढीपाडवाच्या शुभ मुहुर्तावर दि. १३ एप्रिल पासून दररोज सकाळी ११ वा पासून कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले. कर्वेनगर वारजे प्रभागातील नागरिकांच्या सोयीसाठी हे केंद्र सुरू करण्यात आले आहे.

या लसीकरण केंद्रावर रोज २०० लस उपलब्ध होणार आहेत.तरी प्रभागातील ४५ वर्षापुढील नागरिकांनी याचा लाभ घेऊन लसीकरण करून घ्यावे व आपले शहर कोरोना मुक्त करावे.लसीकरण महोत्सवाचा शुभारंभ भाजपा प्रदेश उपाध्यक्ष योगेश गोगावले यांच्या हस्ते पार पडला.






यावेळी नगरसेवक राजाभाऊ बराटे,वृषाली चौधरी,मंजुश्री खर्डेकर, उपायुक्त संतोष वारुळे,आरोग्यअधिकारी सौ तरडे मॅडम, माजी नगरसेवक शिवराम मेंगडे,विठ्ठल बराटे, हेमंत बोरकर ,गणेश पासलकर,आनंत शिंदे, प्रफुल्ल सुभेदार,सतीश झंजाड,अॕड शेटकर,अजय बराटे,दत्तात्रय चौधरी आदी उपस्थित होते. विठ्ठल बराटे म्हणाले, नागरिकांना विनंती आहे की, कोरोना मुक्त आभियानात सहभागी होऊन या सुविधांचा लाभ घ्यावा.
कृपया लसीकरणासाठी येताना आधारकार्ड सोबत आणावे.





















