बावधन,भुसारी कॉलनीत कोविड लसीकरण केंद्र सुरू…

बावधन : – बावधन व भुसारी कॉलनीत महापालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण केंद्राची सुरुवात महापौर मुरलीधर मोहोळ व आमदार भीमराव तापकीर यांच्या हस्ते करण्यात आली. प्रभाग क्रमांक १० मधील नगरसेवकांकडून या भागात लसीकरण केंद्र सुरू व्हावे यासाठी पाठपुरावा करण्यात आला होता. Covid Vaccination Center started at Bawadhan, Bhusari Colony …

यावेळी स्थानिक नगरसेवक दिलीप वेडेपाटील, किरण दगडे पाटील, नगरसेविका अल्पना वरपे, डॉ.श्रद्धा प्रभुणे- पाठक, तसेच रमेश रोठे,मिलिंद अलाटे पुणे महानगरपालिकेचे उपायुक्त संदीप कदम, आरोग्य अधिकारी डॉ.अंजली टिळेकर व नागरिक उपस्थित होते.



बावधन मधील एल.एम.डी. चौक, व्हॅले व्हिस्ता सोसायटी जवळील ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रात तर कोथरुड उजवी भुसारी कॉलनीतील सावरकर हॉल मध्ये ही लसीकरण केंद्र सुरू करण्यात आली आहेत. या भागात महापालिकेचा एकही दवाखाना नसल्याने अद्यापपर्यंत लसीकरण केंद्र सुरू झाले नव्हते, त्यामुळे नागरिकांना लस घेण्यासाठी इतर केंद्रावर जावे लागत होते. नागरिकांची होणारी गैरसोय थांबावी म्हणून स्थानिक नगरसेवकांकडून पाठपुरावा करण्यात येत होता. त्या पाठपुराव्याला यश मिळाले असून या भागात आता लसीकरण केंद्र सुरू झाले आहे.



या लसीकरण केंद्रामुळे या भागातील नागरिकांची चांगली सोय होणार आहे. कोरोना चा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे असे आवाहन नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांच्याकडून करण्यात आले आहे.















