महाराष्ट्र

सप्तखंजेरी वादक, प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांच्यावरील हल्ल्याची व्हायरल पोस्ट चुकीची

पुणे/नवी मुंबई : सुप्रसिद्ध कीर्तनकार आणि सप्तखंजेरी वादक, प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांच्यावरील हल्ल्याची व्हायरल पोस्ट चुकीची आहे. ही घटना काही वर्षांपूर्वी झाली आहे, अशी सत्यपाल महाराज यांचे पुत्र डाॅ. धर्मपाल चिंचोळकर यांनी दिली आहे.

Img 20230511 wa00027384472977045778543

सन 2017-18 च्या दरम्यान सप्तखंजेरी वादक, प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. प्रबोधनकार सत्यपाल महाराज हे आता ठणठणीत असून विविध कार्यक्रमात व्यस्त असल्याची माहिती डॉ. चिंचोळकर यांनी दिली. प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची पोस्ट व्हॉटसअपवर व्हायरल झाल्यावर नागरिकांनी चिंता व्यक्त केली होती. देशात समाज प्रबोधन करणाऱ्या नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे, कलबुर्गी यांचे खून झाल्यानंतर सातत्याने चिंता व्यक्त केली जात आहे. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संघटक पंकज वंजारे यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि नागरिकांनी कोणतीही माहिती खात्री केल्याखेरीज पुढे पाठवू नये, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. सुप्रसिद्ध कीर्तनकार सत्यपाल महाराज हे ठणठणीत असून आपल्या नियमित कार्यक्रमांमध्ये व्यस्त असल्याचे त्यांच्या मुलाने स्पष्ट केले आहे.

Img 20220425 wa0010282295345156635031542582

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये