पुणे शहर

पुण्यात ससून रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्ससह 284 जणांना कोरोनाची लागण

पुणे : ससून रूग्णालयातील डॉक्टर्स, नर्ससह 284 जण कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. गेल्या 24 तासात 26 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे रुग्णालय प्रशासनावर मोठा ताण आला आहे. ससून मधीलच कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे.

महानगरपालिकेकडून कोरोना विषाणू संसर्ग साखळी तोडण्यासाठी ‘ब्रेक द चेन’चे नियम करण्यात आले आहेत. सण, उत्सव साधेपणाने साजरा करण्याबाबत मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या आहेत. तरीही नागरिकांकडून नियमांचे पालन होत नसल्याने रुग्ण संख्या वाढताना दिसत आहे.

सुधारित मार्गदर्शक सूचनेनुसार सर्व शासकीय, निम-शासकीय व खासगी आणि औद्योगिक आस्थापनांमध्ये मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. दोन डोस घेतलेल्यांना सरकारी कार्यालयात प्रवेश आहे. तसेच कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण तातडीने पूर्ण करण्याबाबत मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या आहेत.

Img 20220118 wa00126707376222918832787

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये