कोरोना काळात रुग्ण सेवा देणाऱ्या १२६ डॉक्टरांचा नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांच्याकडून सन्मान..

कोथरुड : डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या स्मृतिदिन सेवा सप्ताहाचे निमित्त साधून कोरोना महामारीत सर्वजण भयभीत असताना रुग्णसेवा करत जागतिक महामारीशी झुंज देणाऱ्या १२६ डॉक्टरांचा सन्मान भाजप नगरसेवक दिलीप वेडेपाटील व राष्ट्रसेवा प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आला. कोरोनायोद्धा डॉक्टरांचा हा सन्मान सोहळा बावधन खुर्द येथे पार पडला. Corporator Dilip Vedepatil honors 126 doctors who served patients during Corona period.

आपली मनोगते व्यक्त करताना या महामारीशी सामना करताना आलेल्या चांगल्या वाईट अनुभवांचे कथन अनेक डॉक्टरांनी यावेळी केले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून संभाजी भाग पुणे महानगरचे कार्यवाह सुधीर जवळेकर बबन दगडेपाटील, डॉ.बाळकृष्ण गायकवाड, डॉ.राजकुमार अंबाड, डॉ. मिलिंद पाटील, डॉ.सचिन नागापूरकर आदी उपस्थित होते.



कोरोनाच्या संकटकाळी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता जनहितार्थ सेवारूपी कार्य करणाऱ्या डॉक्टरांचा सन्मान करण्याचे भाग्य माझ्या हातून घडले. हा माझ्या जीवनातील सर्वात मोठा आनंदी क्षण आहे असे मत यावेळी नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांनी व्यक्त केले. यावेळी उपस्थित १२६ डॉक्टरांचा आदरपूर्वक सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.संगिता देशमुख व विजय करंजावणे यांनी केले.



