पुणे शहर

पुण्यात मिनी लॉक डाऊन सहा नंतर संचारबंदी ; याशिवाय पुढील सात दिवस हे राहणार बंद

पुणे : पुणे शहरात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन हॉटेल, बार, रेस्टॉरंट, बस सेवा, धार्मिक स्थळे उद्यापासून पुढील सात दिवसांसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. तर पुण्यात मिनी लॉकडाऊन सायंकाळी सहा नंतर संचारबंदी करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालक मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षततेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.Curfew after mini lockdown in Pune; Besides, it will be closed for the next seven days    

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुणे जिल्ह्याची कोरोना आढावा बैठक आज घेण्यात आली.  पुणे जिल्ह्यात तूर्तास लॉकडाऊन करण्यात आले नसले तरी कडक निर्बंध या बैठकीत घेण्यात आले.या बैठकीला उपमुख्यमंत्र्यांसह विभागीय आयुक्त, पुणे जिल्हाधिकारी, पुणे आणि पिंपरी चिंचवडचे महापालिका आयुक्त, जिल्हा परिषद सीईओ, दोन्ही मनपा पोलीस आयुक्त, पुणे ग्रामीण एसपी, वैद्यकीय अधिकारी, दोन्ही मनपा महापौर, वैद्यकीय अधिकारी, खासदार, आमदार उपस्थित आहेत.

पुण्यात गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांची आकडेवारी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे परिस्थिती चिंताजनक झाली आहे. त्यामुळे पुण्यात लॉक डाऊन होणार याची चर्चा सुरू होती. परंतु पूर्ण लॉक डाऊन न करता कडक निर्बंध करून कोरोना ला अटकाव करण्याचा प्रयत्न आता शासनाकडून केला जाणार आहे.

काय आहेत नविन कडक…

संध्याकाळी सहा ते सकाळी सहा अत्यावश्यक सेवा वगळून संचारबंदी

हॉटेल, बार, रेस्टॉरंट, सार्वजनिक बस सेवा, धार्मिक स्थळे उद्यापासून पुढील सात दिवसांसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत.

सिनेमागृह, नाट्यगृह, मॉल राहणार बंद

लग्न समारंभ व अंत्यसंस्कार सोडून कोणत्याही कार्यक्रमांना बंदी , सायंकाळी सहानंतर संचार बंदी

मानवी दृष्टीकोन ठेऊन पोलीस कारवाई करणार.

पुढील शुक्रवारी बैठक घेऊन आगामी निर्णय घेण्यात येतील.

दिवसा जमाव बंदी -पाच पेक्षा अधिक लोकांनी एकत्र येऊ नये.

हॉटेल पार्सल सेवा संध्याकाळी सुरू राहणार

एस टी प्रवासावर कोणतीही निर्बंध नाहीत

सकाळी उद्याने सुरू राहणार तर सायंकाळी बंद राहणार

Img 20210223 wa0156

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये