शिवसंग्राम संघटनेच्या सामाजिक न्याय विभागाच्या पुणे शहराध्यक्षपदी विनोद शिंदे यांची निवड

पुणे : शिवसंग्राम संघटना सामाजिक न्याय विभागाच्या पुणे शहराध्यक्ष पदी विनोद शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांच्या उपस्थितीत पुण्यात झालेल्या बैठकीत त्यांची निवड करण्यात आली आहे. Vinod Shinde as the Pune City President of the Social Justice Department of Shiv Sangram Sanghatana
यावेळी शिवसंग्राम संघटनेचे शहराध्यक्ष भरत लगड, सचिव शेखर पवार, तुषार काकडे, चेतन भालेकर, कालिंदी गोडांबे, संगीता घुले, व पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. विनोद शिंदे यांच्यावर या आगोदर संघटनेच्या सामाजिक न्याय विभागाची कोथरुड मतदार संघाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी होती. आता त्यांची संघटनेच्या सामाजिक न्याय विभागाच्या शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

संघटनेने दिलेली जबाबदारी व आमदार विनायक मेटे दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्याची आपण प्रयत्न करणार असून संघटनेचे काम तळागाळापर्यंत पोहचवणार असल्याचे शिंदे यांनी निवडीनंतर सांगितले.



