पुणे शहर

पृथ्वीराज शशिकांत सुतार यांच्या पाठपुराव्यास यश भेलकेनगर चौकात रस्ता रुंदीकरण

कोथरूड : पुणे महापालिकेतील शिवसेनेचे गटनेते व स्थानिक नगरसेवक पृथ्वीराज सुतार यांच्या पाठपुराव्याला यश आले असून अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या भेलकेनगर चौक येथे रस्त्याचे रुंदीकरण झाले.

कोथरूड मधील ” भेलकेनगर चौक ”  येथे रस्तारुंदीकरण अभावी रोज अपघात होत होते,पुणे मनपातील शिवसेना गटनेते,स्थानिक नगरसेवक पृथ्वीराज शशिकांत सुतार यांनी वैयक्तिक पाठपुरावा करून,जागा मालक नानासाहेब भेलके, गोपी भेलके यांच्याशी पुणे मनपाच्या अधिकाऱ्यांसह चर्चा करून,जागा मालकांना योग्य तो मोबदला देऊन सदरची रस्ता रुंदीकरणाची जागा ताब्यात घेतली.त्या ठिकाणी रस्त्याचे काम करून,रस्ताचे रुंदीकरण केले.यामुळे संभाव्य अपघात टाळण्यास व वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.

Img 20210402 wa0031

सुतार म्हणाले, गेल्या अनेक वर्षापासून भेलके नगर चौकातील रस्ता रुंदीकरणाचा प्रश्न प्रलंबित होता. यामुळे या चौकात सातत्याने किरकोळ अपघात होत होते. याठिकाणी गंभीर अपघाताची शक्यता होती. त्यामुळे महापालिका आणि जागा मालक यांच्याशी यशस्वी चर्चा करून अखेर जागा ताब्यात घेऊन रस्ता रुंदीकरणाचा प्रश्न मार्गी लावला.

Img 20210223 wa0156

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये