राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त कोथरुडमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांना सुरक्षा किट..

कोथरुड : pune city राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त संतोष डोख व दिपाली डोख यांच्या वतीने कोथरुड मधील प्रभाग क्र. ११ मधील सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना मास्क व सॅनिटायझर असे सुरक्षा किट वाटप पुणे महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांच्या हस्ते करण्यात आले. Safety kits for health workers in Kothrud on the occasion of NCP’s anniversary.
याप्रसंगी महिला अध्यक्षा ज्योती सूर्यवंशी, संतोष मोहोळ, किशोर शेडगे, निलेश शिंदे, हनुमंतराव मोहोळ, आशा जमदाडे, सारिका चोरघडे, सचिन जोरी, भोसले मुकादम, निलेश क्षीरसागर, राहुल बोडके, संघर्ष मित्र मंडळाचे सर्व कार्यकर्ते, परिसरातील ज्येष्ठ नागरिक, आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
आरोग्य कर्मचारी कोरोनाच्या कठीण काळात करत असलेले काम कौतुकास्पद आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी आरोग्य कर्मचारी काम करत असतात आणि म्हणूनच त्यांच्या सुरक्षेसाठी त्यांना सुरक्षा किट देण्यात आल्याचे संतोष ढोक यांनी सांगितले.




