पुणे शहर

राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांची शहर कार्यकारिणी कशी असणार ? राजकीय वर्तुळात उत्सुकता..

शहर कार्यकारिणी होणार जाहीर

अमोल साबळे

पुणे : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आपल्या सहकाऱ्यांसह भाजप बरोबर सत्तेत सहभागी झाले आणि पक्षात फूट पडली. त्यानंतर अजित पवारांनी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे शहर अध्यक्षपदी शहराच्या प्रत्येक भागात सर्व स्तरात संपर्क असणारे आणि उत्तम संघटक अशी ओळख असणारे माजी उपमहापौर दीपक मानकर यांची निवड केली.

ही निवड झाल्यानंतर गेली महिनाभर दीपक मानकर यांचे शहराच्या अनेक ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने नागरी सत्कार तर होतच आहेत, पण त्या बरोबरच मानकर यांनी शहराच्या कानाकोपऱ्यात असंख्य कार्यकर्त्यांच्या कार्यालयाला भेटी देत शहर पिंजून काढले आहे. त्यांच्या या निवडीमुळे कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा उत्साह आहे. शहरात आपल्या पाठीमागे आता खंबीर उभे राहणारे नेतृत्व मिळाल्याने कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आनंदाची भावना निर्माण झाली आहे. दीपक मानकर अध्यक्ष झाल्यामुळे शहराची कार्यकारिणी ही तेवढीच सर्वसमावेशक आणि तळागाळपर्यंत जाऊन काम करणारी असणार एवढे मात्र नक्की मानले जात आहे.

दोन दिवसांपूर्वी अजित पवारांची भेट घेत दीपक मानकर यांनी कार्यकारीणी बाबत चर्चा केली केली आहे. पवार यांच्या मार्गदर्शनानुसर शनिवार १९ ऑगस्ट रोजी ही कार्यकारणी जाहीर होणार आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)पुणे शहराची कार्यकारणी नेमकी कशी असणार ? कोणत्या पदावर कोणत्या कार्यकर्त्याची नियुक्ती होणार याबाबत आता राजकीय वर्तुळात उत्सुकता दिसून येत आहे. इतर पक्षांचेही राष्ट्रवादीच्या या होणाऱ्या कार्यकरणीकडे लक्ष लागून राहिले आहे.

दीपक मानकर यांनी पुणे शहराध्यक्ष पद स्वीकारल्यानंतर असंख्य नविन कार्यकर्ते पक्षाशी जोडले गेले आहे. पक्षातील जुने कार्यकर्ते आणि नवीन जोडलेले कार्यकर्ते असा समतोल साधत नवीन कार्यकारिणी केली जाईल तसेच आगामी काळात होणाऱ्या पालिका, लोकसभा, विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊनच ही कार्यकारणी मानकर यांच्याकडून केली जाईल असे बोलले जात आहे.

Img 20230803 wa00041486684870724290474
Img 20230511 wa000228129

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये