पुणे शहर
कोथरूडमध्ये खड्ड्यात वृक्षारोपण करून मनसेचे पुणे महापालिकेविरोधात आंदोलन

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोथरूड विभागाच्या वतीने आज रस्त्यावरील खड्डे या विषयात पुणे महापालिकेच्या विरोधात खड्ड्यात वृक्षारोपण करून आंदोलन करण्यात आले.
कर्वे रस्त्यावरील पौडफाटा चौकातील वीर सावरकर उड्डाणपूला जवळ रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करत प्रशासनाचा निषेध करण्यात आला.
या वेळी मनसे कोथरूड विभाग अध्यक्ष सुधीर धावडे, सुरेखा होले, शाखा अध्यक्ष रमेश परदेशी, विराज डाकवे, रमेश उभे, संतोष वाघमारे, योगेश वाव्हळ, दत्ता पायगुडे, अरुण हुलावळे, नितीन गायकवाड, वृषाली धुमाळ, स्नेहल शिंदे, तन्मय मेमाणे, बाळा शिंदे , राजेंद्र वेडेपाटील यांच्या सह अनेक महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.













