वारजेत हळदी कुंकू समारंभात गुरव समाज नारी शक्तीचे दर्शन..

वारजे : गुरव समाज नारी शक्ती चा हळदी कुंकू समारंभ वारजे भागात उत्साहात संपन्न झाला. समाजाच्या महिला मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. हळदी कुंकू समारंभाच्या निमित्ताने पहिल्यांदाच गुरव समाज नारी शक्तीचे दर्शन झाले. आनंदी वातावरणात हा सोहळा पार पडला.
वारजेतील रेणुका नगर येथील जिजामाता महिला प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी हा कार्यक्रम पार पडला. यावेळी उपस्थित महिलांना बचत गटातील तसेच समाजासाठी असणाऱ्या महामंडळातील योजनांबाबत माहिती देण्यात आली.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक व शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष बाबा धुमाळ, पुणे महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाच्या शुभांगी मापरे, पुणे महानगरपालिका बचत गट समूह संघटिका शीतल साळुंखे, राष्ट्रीय गुरव समाज महासंघ महिला राष्ट्रीय अध्यक्षा अनुपमा गुरव, मानसी नलावडे, माजी नगरसेविका संगीता ठोसर आदी उपस्थित होते.



हळदी कुंकू समारंभाचे औचित्य साधून गुरव समाजाच्या महिला पहिल्यांदाच मोठ्या संख्येने एकत्र आल्याने समाजाचा एकोपा दिसून आला. गुरव समाजाला एकत्र व संघटीत करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला.
या प्रसंगी महिला कमिटीच्या मनीषा पाटील, वैशाली पाटील, सपना डांगे, वर्षा गवळी, सुरेखा गुरव, राजश्री पारखे, तर कोर कमिटीचे अरुण पाटील, पुरुषोत्तम गवळी, दत्तात्रय गुरव, लक्ष्मण डांगे, अनंत पाटील, गणेश पावशेरे, सचिन बिरादार, प्रदीप पाटील, बळीराम भंडारकुमटे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजश्री पारखे यांनी केले तर आभार सपना डांगे, वर्षा गवळी, अमृता गुरव यांनी केले.


