पुणे शहर

‘दगडूशेठ गणपती’ च्या सजावटीस वासापूजनाने प्रारंभ; हिमाचल प्रदेश मधील श्री जटोली शिवमंदिराची प्रतिकृती साकारणार

पुणे : यंदाच्या गणेशोत्सवात दगडूशेठ गणपतीला करण्यात येणाऱ्या सजावटीचा प्रारंभ करण्यात आला.दगडूशेठ गणपतीचा उत्सव बेलबाग चौकात साजरा होतो. त्या ठिकाणी मंत्र आणि जय गणेशच्या घोषात वासापूजन  करण्यात आले. या वर्षी हिमाचल प्रदेश मधील श्री जटोली शिवमंदिराची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे.

यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण, उपाध्यक्ष डॉ.रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे, उपाध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस हेमंत रासने, उत्सवप्रमुख अक्षय गोडसे, सहचिटणीस अमोल केदारी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, यतिश रासने, मंगेश सूर्यवंशी, सौरभ रायकर, राजाभाऊ सूर्यवंशी, राजाभाऊ चव्हाण, इंद्रजित रायकर, राजूशेठ सांकला, राजू चिंचोरकर, तुषार रायकर आदी उपस्थित होते. 

Img 20240404 wa00162092919036315770776

गणेशोत्सवात साकारण्यात येणाऱ्या जटोली शिवमंदिराच्या प्रतिकृतीचा आकार १२५ फूट लांब, ५० फूट रंद आणि १०० फूट उंच असणार आहे. मंदिराची प्रतिकृती फायबर मध्ये उभारण्यात येणार आहे. कलादिग्दर्शक अमन विधाते मंदिराच्या प्रतिकृतीचे काम करणार असून, विद्युतरोषणाई वाईकर बंधू यांची राहील आणि मंडपव्यवस्था काळे मांडववाले करीत आहेत.

Img 20240404 wa00132425955639205292116
Img 20240404 wa00127754739105663743070

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये