पुणे शहर
बहुली (भगतवाडी) येथील जळीत ग्रस्त कुटुंबांना दीपक मानकर यांच्याकडून जीवनावश्यक वस्तूंची मदत..

कोथरुड : बहुली (भगतवाडी) येथे १४ मार्च रोजी लागलेल्या आगीत सुमारे १६ कुटुंबाची घरे जळून खाक झाली होती. या कुटुंबांना माजी उपमहापौर दीपक मानकर यांच्या वतीने घरगुती जीवनावश्यक वस्तूची मदत करण्यात आली आहे. Deepak Mankar donates essential items to the burnt families at Bahuli (Bhagatwadi).
यावेळी दिवा प्रतिष्ठानचे संस्थापक हर्षवर्धन मानकर पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शुक्राचार्य वांजळे, सांगरून गावच्या मा. सरपंच सिताबाई मानकर , बहुली चे उपसरपंच बंडा भगत व ग्रामस्थ उपस्थित होते.
अशा संसार उध्वस्त करणाऱ्या आगीच्या घटना फार दुःखद व मन हेलावून टाकणाऱ्या असतात. त्यामुळे आगीच्या घटना टाळण्यासाठी सर्वांनी खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे हर्षवर्धन मानकर यांनी म्हंटले आहे.




