पुणे शहर

पुणे महापालिकेच्या अंदाजपत्रकातील त्रुटींवरून दिपाली धुमाळ यांनी केले भाजपला लक्ष्य..

पुणे :  पुणे महानगरपालिकेच्या 2021-2022 च्या अंदाजपत्रकावरील आपल्या भाषणात आज विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी बजेट मधील त्रुटींकडे लक्ष वेधत पालिकेतील सत्ताधारी भाजपवर टीकास्त्र सोडले. स्थायी समिती अध्यक्षांनी 0 बजेट घेतल्याचा दावा कसा खोटा आहे व कशा पद्धतीने त्यांनी आपल्या भागात निधी वळवला आहे यावर त्यांनी भाष्य केले. Deepali Dhumal targeted BJP over errors in Pune Municipal Corporation’s budget ..

स्थायी समिती अध्यक्ष स्वतः ला 0 बजेट घेतले म्हणतात आणि जवळपास पीपीपी मधील 70 टक्के योजना त्यांच्याच प्रभागात आणि कसबा विधानसभा मतदार संघात आहेत. निधीचे वितरण ही असमान आहे. भाजप नगरसेवकांना 5 कोटी तर विरोधकांना केवळ 2 कोटींचा निधी दिला आहे. महापालिकेत सत्ता भाजपची असली तर अंदाजपत्रक शहराचे आहे याचा विचार यात कुठेही नाही त्यामुळे शहराचा असमतोल विकास होणार आहे. अंदाजपत्रकात भाजपने आयुक्तांच्या अंदाजपत्रकाला 30 टक्के कात्री लावली आहे. त्यामुळे अनेक मोठे प्रकल्प रखडणार आहेत. याला सर्वस्वी भाजप जबाबदार असेल. याचे पुणेकरांना उत्तर द्यावे. असे आवाहन धुमाळ यांनी केले आहे.

धुमाळ म्हणाल्या, पीपीपी तत्वावर रस्ते आणि नदी पूल करण्याला यापूर्वीच मान्यता दिली आहे. आता सारसबाग, तुळशीबाग, मंडई, महर्षी दाते मुद्रनालय देखील पीपीपी तत्वावर विकसित करण्याचे स्वप्न दाखवले आहे. सर्व प्रकल्प 5 हजार कोटी रुपयांचा पुढील आहेत. यातून पुढील 10 वर्षात महापालिकेवर दरवर्षी साधारण 500 कोटी रुपयांचे दायित्व येण्याची शक्यता आहे.  या सर्व प्रकल्पाचे स्वप्न विधानसभेचे उमेदवार म्हणून दाखवली हे यातून दिसून येते. तुमच्या आमदारकीच्या स्वप्नासाठी उर्वरित शहर ‘ कंगाल ‘ आणि ‘ बकाल ‘ करू नका. आजही आमच्या उपनगरातील रस्ते पूर्णपणे विकसित होऊ शकलेले नाहीत, पावसाळी गटारे नसल्याने रस्त्यावर ओढे वाहतात . ही कामे करण्यासाठी पहा तुमचे
‘विकसक मित्र ‘ पुढे येताहेत ? असे झाल्यास पुणेकर तुम्हाला आमदारच काय पुढचा खासदारही करतील असा टोला धुमाळ यांनी लगावला आहे. Don’t ‘poor’ the rest of the city for your legislative dream;  Deepali Dhumal’s criticism of Hemant Rasane

दिपाली धुमाळ यांनी आपल्या बजेट वरील भाषणात उपस्थित केलेले मुद्दे

फुगवलेल्या अंदाजपत्रकात हवा भरण्याचा प्रकार
1 ) मागील चार वर्षांत पालिकेचे उत्पन्न साडेचार हजार कोटी रुपयांच्या आसपास राहिले आहे. मात्र स्थायी समितीने 8370 कोटींचे अंदाजपत्रक सादर केले आहे. आत्मविश्वास असावा पण नागरिकांची फसवणूक करण्याइतपत बेगडी नसावा.
2) महसुली खर्च वाढत आहे. भांडवली खर्चाला प्रशासन चाप लावत आहे. त्यांनाही उत्पन्न गोठत चालल्याची जाणीव आहे. परंतु प्रशासनच उसने अवसान आणून आणि महापालिका कर्ज बाजारी करून अंदाजपत्रक फुगवत आहे, त्यात आपण हवा भरत आहात.

Img 20210223 wa0156

3) मध्यवर्ती भागात 10 रुपयांत प्रवास संकल्पना चांगली आहे. पण मुद्दा आहे तो शहराच्या अन्य भागातून शहरात येणाऱ्या नागरिकांचा. उलट अन्य भागातूनही मोठ्या प्रमाणावर नागरिक मध्यवर्ती भागात येतात. मध्यवर्ती भागात व्यवसाय, नोकरी, शिक्षण आणि खरेदी साठी येणाऱ्यांमध्ये सर्वसामान्य नागरिक, महिला आणि विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. हडपसर, कात्रज, नगररोड, वारजे, धायरी, बोपोडी अशा उपनागरातून शहरात स्वारगेट, पुणेस्टेशन, शिवाजीनगर अशा केंद्रीय ठिकाणापर्यंत 10 रुपयांत प्रावस ठेवल्यास किमान शहराच्या मध्यवर्ती भागात खासगी वाहनांचा वापर कमी होईल. तर मध्यवर्ती भागात अटल सेवेने 5 रुपयांत प्रवासही करणे शक्य होईल. येऊ घातलेल्या मेट्रो प्रकल्पासाठी बसेस ची अल्पदारातील  कनेक्टिव्हिटी फायदेशीर ठरेल, असे मला वाटते. परत यासाठी येणारा खर्च कसा उचलणार ? तोटा वाढल्यास तो कसा भरून देणार याचे स्पष्टीकरण अध्यक्षांनी द्यावे.

Whatsapp image 2021 03 03 at 10. 04. 12 pm

अपघात विम्याच्या जनजागृतीवरच खर्च आधिक
4) पंडित दीनदयाळ उपाध्याय अपघात विमा योजनेचा प्रीमियम 7 ते 8 कोटी रुपये. तर या योजनेच्या जनजागृतीचा खर्च 5 कोटी रुपये. महापौर मुळातच ही नियमित कर भरणाऱ्या नागिकांसाठी योजना आहे. तीन वर्षे झालेय ही योजना राबवतोय. मिळकत कराच्या बिलांवर योजनेचा तपशील दिला तरी थेट मिळकत दाराला माहिती मिळणार आहे. दुसरे मिळकत कर विभागाकडे सर्व प्रॉपर्टी धारकांचे मोबाईल नंबर आहेत. त्यावर योजनेचा तपशील पाठवला तरी जनजागृती होणार आहे. मग पाच कोटी रुपये नेमके कोणाच्या घशात घालण्यासाठी ठेवले आहेत?

शिक्षणाच्या माहेरघरात च शिक्षणाचा विसर
5) पुणे हे शिक्षणाचे माहेरघर आहे. परंतु आपल्याला शिक्षणाचाच विसर पडलेला आहे. कोरोनाने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. अगोदरच गरिबीमुळे शाळाबाह्य राहणाऱ्या वैद्यर्थ्यांची संख्या मोठी होती. त्यामध्ये कोरोना मुळे निर्माण झालेल्या आर्थिक परिस्थितीने अधिकच भर पडली आहे. सध्या ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. दुर्दैवाने कोरोनाची परिस्थिती आणखी काही महिने अशीच राहिल्यास गरीब मुलांचा शिक्षणापासून संबंधच तुटण्याची भीती आहे. आशा वर्गाचा प्रामुख्याने महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या एक लाखाहून अधिक विद्यर्थ्यांच्या भवितव्याचा विचार अंदाजपत्रकात करण्यात आलेला नाही. ऑनलाईन शिक्षण मिळावे यासाठी नवीन कुठलेच ठोस कार्यक्रम देण्यात आले नाहीत. अध्यक्ष तुम्ही गरिबांना विसरलात. केवळ कोट्यवधींचे आकडे फुगवून आणि विकासाची आभासी प्रतिमा दाखवून आपण ही ‘ अच्छे दिन चे ‘ निवळ गाजर दाखवले आहे.

6) महापालिकेचे उत्पन्न वाढावे यासाठी विरोधात असतानाही आम्ही सहकार्याचीच भूमिका ठेवली आहे. परंतु याचा अर्थ उत्पन्न वाढवण्यासाठी उद्या तुम्ही महापालिका विकायला काढाल तर त्याला आमचा विरोध राहील. 7) चार वर्षांत काही जमले नाही. एक असा प्रकल्प दाखवा की तो तुम्ही केलाय हे ठामपणे सांगू शकाल. भामा आसखेड प्रकल्प, चोवीस तास पाणी पुरवठा, मेट्रो, हे प्रकल्प आम्हीच सुरू केले. पण चार वर्षात एखादं दुसरा उड्डाणपूल वगळता काय केले हे सांगायला आपल्याकडे नाही.

त्यामुळे अध्यक्ष आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अजून दोन, चार स्वप्नवत कल्पना  मांडल्या असत्या तरी चालले असते. कारण मागील सहा साडेसहा वर्ष देश फक्त स्वप्नातच जगतोय, त्याला तुम्ही तरी कसे अपवाद ठरणार असा आरोप धुमाळ यांनी केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये