पुणे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी दिगंबर दुर्गाडे, उपाध्यक्षपदी सुनील चांदेरे

पुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची आज निवडणूक पार पडली. अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी जिल्ह्यातील 3 ते 4 नावं चर्चेत होती. यामध्ये आमदार दिलीप मोहिते पाटील, आमदार अशोक पवार, माजी आमदार रमेश थोरात ही नावं चर्चेत होती. मात्र, अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या प्रा. दिंगबर दुर्गाडे यांचं नाव निश्चित केलं आहे. दिंगबर दुर्गाडे यांनी यापूर्वी देखील जिल्हा बँकेचं अध्यक्षपद भूषवलेलं आहे. उपाध्यक्षपदासाठी सुनील चांदेरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
अजित पवार सर्व निवडून आलेल्या संचालकांची बैठक घेत नाव निश्चित केले आहे. जिल्हा बँकेवर 17 जागा जिंकत राष्ट्रवादीने वर्चस्व कायम ठेवले आहे. अजित पवार बँक संचालक यांच्यातील जिल्हा बँक अध्यक्षपद आणि उपाध्यक्षपदाबाबतची आज बैठक झाली. जवळपास एक तास संचालकांशी अजित पवारांनी चर्चा केली. एक तास चाललेल्या बैठकीत अजित पवार यांनी इच्छुकांची मतं जाणून घेतली.







