पुणे शहर

पतंग मिळाल्याने मुलांनी केला जल्लोष..

कर्वेनगर : मकर संक्रांत म्हंटल की, मुलांसाठी आनंदाचा सण कारण या दिवशी व त्यापुढे काही दिवस त्यांना आकाशात पतंग उडवण्याचा आनंद मनसोक्त घेता येतो. मुलांचा हा आनंद द्विगुणित व्हावा यासाठी वारजे येथील आकाशनगर मधील मुलांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कोथरुड मतदार संघाचे माजी अध्यक्ष प्रमोद शिंदे यांच्या वतीने पतंग वाटप करण्यात आले.

पतंग मिळाल्यानंतर या भागातील मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता. मुलं म्हंटल की, त्यांना एक पतंग पुरेशी होत नाही कारण पतंग उंच आकाशात असताना तुटून जाऊ शकते किंवा ती उडवताना फाटूही शकते. त्यामुळे प्रमोद शिंदे यांच्याकडून पतंग मिळाल्याने मुलांनी जल्लोष साजरा केला.

पतंग मिळाल्याने मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता. त्यांचा तो आनंद पाहून लहानपणाची आठवण झाल्याचे प्रमोद शिंदे यांनी सांगितले.

Screenshot 20211227 1402344603556305344739789

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये