पुणे शहर
रक्षाबंधन निमित्त 12 ते 15 हजार घरांमध्ये 50 हजार राख्यांचे वाटप

घरोघरी जाऊन बहिणींना दिली अनोखी भेट
पुणे : कोरोनाच्या या संकट काळा मुळे सर्व सण उत्सव साजरे करण्यावर बंधन आल्यामुळे साधे पणाने सण साजरे करावे लागत आहे. सर्वसामान्य जनतेचे सण आनंदात साजरे व्हावे रक्षाबंधन हा बहीण भावाच्या अतूट नातं असलेला सण साजरा करता यावा यासाठी शिवसेनेच्यावतीने उपशहरप्रमुख बाळासाहेब मालुसरे यांनी जवळपास पंधरा हजार घरामध्ये 50 हजार राख्यांचे वाटप केले.
मालुसरे म्हणाले, बहीण भावाच्या अतूट नातं असलेला हा रक्षाबंधनाचा सण आनंदाने साजरा करता यावा. म्हणून पुण्यातील मंडई परिसर, बुधवार पेठ, शुक्रवार पेठ, रविवार पेठ भागात घरोघरी जात राखी वाटप केले.




