कोथरुड

संत तुकाराम उद्योग समुहाच्या वतीने ज्येष्ठ नागरीकांना एसटी स्मार्ट कार्ड वाटप

कर्वेनगर : संत तुकाराम उद्योग समुहाच्या वतीने ज्येष्ठ नागरीकांसाठी एस टी स्मार्ट कार्ड वाटपाचा तसेच वारजे कर्वेनगर भागातील दिव्यांग व्यक्ती, पुणे महानगरपालिकेचे आरोग्य सेवक, रिक्षा संघटना, ट्री हाऊस शाळेतील कर्मचारी वर्गाला मिठाई व दिवाळी फराळ वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कर्वेनगर मधील दुधाने लॉन्स येथे हा कार्यक्रम पार पडला. यावेळी पुणे महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, माजी उपमहापौर दिलीप बराटे, नगरसेवक राजेश बराटे, सुशील मेंगडे,  नगरसेविका वृषाली चौधरी, शिवसेना जिल्हा प्रमुख रमेश कोंडे, पंचायत समिती सदस्य बाळासाहेब मोकाशी, बाळासाहेब बराटे, श्रीकृष्ण बराटे, विठ्ठल बराटे, बाबा खान, तसेच कर्वेनगर भागातील विविध क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन संत तुकाराम उद्योग समूहाचे संस्थापक, अध्यक्ष माणिक दुधाने, प्रवीण दुधाने व सौ. तेजल मयुर दुधाने यांच्या वतीने करण्यात आले होते.

Whatsapp image 2020 11 13 at 2. 39. 00 pm
Whatsapp image 2020 11 13 at 2. 39. 13 pm
Img 20201118 wa0057

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये