नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांच्या वतीने बावधन-कोथरूड डेपो मधील नागरिकांना दिवाळी सरंजाम भेट

पुणे : दीपावली सरंजाम भेट व ऑनलाइन नोकरी महोत्सवा अंतर्गत माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे व खासदार गिरीष बापट यांच्या हस्ते नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे प्रभाग क्र.10 बावधान-कोथरूड डेपो मधील 6000 कुटुंबांना दिवाळी सरंजाम भेट (रवा,मैदा,पिठी साखर,तेल,डालडा,बेसन,उटणे,मोती साबण,भाजके पोहे,पणती,सुगंधी तेल ई.) वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाचे औचित्य साधत यावेळी प्रभागात राबविल्या जाणार्याे ऑनलाइन नोकरी महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी रावसाहेब पाटील दानवे म्हणाले, या जागतिक महामारीच्या काळात या कठीण प्रसंगात अनेक गोरगरीब लोकांना दिवाळी साजरे करणे शक्य नाही अशा सर्वांना दिवाळी भेट देऊन नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांनी अत्यंत स्तुत्य असा उपक्रम प्रभागात राबविला आहे.

खासदार गिरीषजी बापट म्हणाले सामान्य गरीब कुटुंबाची दिवाळी चांगली व्हावी यासाठी नगरसेवक दिलीप वेडेपाटील जे प्रयत्न करत आहेत त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो, तसेच लॉकडाऊनच्या काळात अनेक नागरिकांची नोकरी गेली त्यांनाही नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांच्या माध्यमातून येत्या काळात ऑनलाइन नोकरी महोत्सवाचे आयोजन केले जाणार आहे त्यात जे काम देणार आहे आणि काम करणार आहे यांच्यात मध्यस्थाची भूमिका करत नगरसेवक दिलीप वेडेपाटील हे त्यांची सांगड घालून देणार आहेत असा स्तुत्य उपक्रम त्यांनी राबविला त्याबद्दल त्यांचे विशेष आभार मानावे असा चांगला उपक्रम त्यांनी राबविला आहे.



याप्रसंगी आमदार भीमराव तापकीर, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने,युवा मोर्चा पुणे शराध्यक्ष राघवेंद्र मानकर,नगरसेवक दीपक पोटे,नगरसेवक किरण दगडे पाटील, नगरसेविका अल्पना गणेश वरपे, नगरसेविका श्रद्धा प्रभुणे-पाठक,सचिन मोरे,पुनीत जोशी,विलास मोहोळ,वैभव मुरकुटे,बाळा टेमकर, दुश्यांत मोहोळ,सागर कडू,कैलास मोहोळ,रमेश चव्हाण,मंदार घुले, धनंजय दगडे,अमर कोकाटे, अजय मोहोळ, राजेश मनगिरे, राजेश कुलकर्णी, सचिन धनकुडे, कैलास माझीरे, बंडू भंडारी, रुपेश भोसले, विजय राठोड, सचिन धनकुडे, सुरेंद्र कंधारे आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन दिग्विजय जोशी यांनी केले व आभार शैलेश वेडेपाटील यांनी मानले.



