कोथरुड

सामाजिक उपक्रमामध्ये सातत्य ठेवणे हे किरण दगडे पाटील यांचे वैशिष्ट्य : दानवे पाटील

कोथरुड : सामाजिक उपक्रमामध्ये सातत्य ठेवणे हे किरण दगडे पाटील यांचे वैशिष्ट्य आहे. सलग चार वर्ष पाच हजार लोकांसाठी दिवाळी सरंजाम वाटप सारखा उपक्रम राबवणे हे कौतुकास्पद आहे. निवडणुका असू किंवा नसू त्यांचे उपक्रम चालू असतात. असे गौरवोद्गार केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनी काढले.

प्रभाग क्रमांक १० भुसारी कॉलनी बावधन मधील मधील ५ हजार नागरिकांना दिवाळी सरंजाम वाटप कार्यक्रमात चौथ्या दिवशी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पाटील व पुण्यनगरीचे खासदार गिरीश बापट यांच्या हस्ते सरंजाम किटचे वाटप करण्यात आले.

Img 20201028 wa0145

नगरसेवक किरण दगडे पाटील यांच्याकडून गेल्या ६ वर्षांपासून या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत असते. कोरोना च्या पार्श्वभूमीवर दिवाळी सरंजाम वाटताना योग्य नियोजन करण्यात आले असून चार दिवस भुसारी कॉलनीतील स्वातंत्र्यवीर सावरकर मैदानावर टप्प्याटप्प्याने या सरंजाम किटचे वाटप करण्यात आले

Img 20201024 wa0166 1

याप्रसंगी भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष बाप्पू मानकर, भाजपा कोथरुड मतदार संघ अध्यक्ष पुनीत जोशी, नगरसेवक दिलीप वेडेपाटील, बावधन सरपंच पियुषा किरण दगडे पाटील नगरसेविका अल्पना वरपे, श्रद्धाताई प्रभुणे पाठक, स्वीकृत सदस्य वैभव मुरकुटे,  बाळा टेमकर, विलास मोहोळ, प्रभाग १० भाजपा अध्यक्ष सागर कडू, धनंजय दगडे , सरचिटणीस खडकवासला  अजय मोहोळ, कोथरुड उपाध्यक्ष रुपेश भोसले, कोथरुड चिटणीस अभिजित गाडे, कोथरुड महिला मोर्चा उपाध्यक्ष सुप्रिया माझिरे, राजेश कुलकर्णी,  बी.डी.पी. समिती सभासद प्रतीक वायकर, उपाध्यक्ष भाजपा ओबीसी मोर्चा विजय राठोड आदी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये