पुणे शहर

मुळशीत रानडुक्कराच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या ११ वर्षीय मुलाचे ससूनमधील डॉक्टरांनी वाचविले प्राण ; दुर्मिळ शस्त्रक्रिया यशस्वी

जखमी मुलावर डॉक्टरांनी केली तातडीची शस्त्रक्रिया

पुणे : गेल्या आठवड्यात मुळशी तालुक्यातील लवासा परीसरात रानडुक्कराकडून जबर हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या ११ वर्षीय आदिवासी मुलाला अत्यवस्थ स्थितीत ससूनमधील बालरोगशल्यचिकित्साशास्त्र (पेडियाट्रीक सर्जरी) विभागात भरती करण्यात आले. त्याच्या छातीवर खोल जखम झाली होती. बरगड्यांचेही तुकडे – तुकडे झाले होते. जखमेतून फुफ्फूस बाहेर डोकावत होते. तुटलेल्या बरगड्यांमुळे फुफ्फूस तसेच हृदयालाही जखम होऊन मुलं गतप्राण होण्याचा धोका होता. शिवाय जंतूसंसर्ग टाळणेही जिकिरीचे होते. मुलावर तातडीच्या औषधोपचाराबरोबरच इमर्जन्सी शस्त्रक्रियेची आवश्यकता होती. दिनांक १० मे रोजीच त्याच्यावर बालशल्यविशारदांच्या टीमने यशस्वी शस्त्रक्रिया केली.(Doctors in Sassoon save the life of an 11-year-old boy who was seriously injured in a wild boar attack; Rare surgery successful)

यामध्ये विभागप्रमुख डॉ. मीनाक्षी नलबले – भोसले यांच्याबरोबर डॉ. वर्षा सोनी, डॉ. अमीर इक्बाल अली व डॉ. शितल भैसारे यांचा समावेश होता. भूलतज्ज्ञ डॉ. कीर्ती कुंडलवाल व टीमने डॉ. संयोगिता नाईक व डॉ. सुनीता खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली या कठीण परिस्थितीतही बाळाला भुल दिली. मुलाला जंतुसंसर्ग होऊ नये म्हणून रोगप्रतिबंधक व सामाजिक औषधवैद्यकशास्त्र विभागाच्या डॉ. मालन परंडे, डॉ. गणेश जगदाळे व डॉ. रवी शिवशेटे यांनी विशेष काळजी घेतली. आता त्याचा जीव धोक्याबाहेर आहे.

Img 20210516 094854

या मुलाची तब्येत उत्तम असून त्याला पुढील १-२ दिवसात त्याला डिस्चार्ज देता येईल असे रुग्णालयातील सुत्रांनी सांगितले. सदर दुर्घटना दुर्मिळ असून अद्याप लिखित नियकालिकांमधून अशा प्रकारच्या घटनेची नोंद आढळून येत नाही. ससूनमधील बालशल्यविशारदांच्या टीमने ही दुर्मिळ शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली व गंभीर जखमी झालेल्या मुलाला जीवदान दिले, अशी माहिती डॉ. मिनाक्षी भोसले यांनी दिली.

Screenshot 2021 05 12 21 44 03 43 1
Fb img 1620720024574

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये