महाराष्ट्र

पुणे विभागातील 15 लाख 19 हजार 928 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी -विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे : पुणे विभागातील 15 लाख 19 हजार 928 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 16 लाख 8 हजार 419 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 56 हजार 127 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 32 हजार 364 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.01 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 94.50 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.( 15 lakh 19 thousand 928 corona infected patients in Pune division were cured at home)

पुणे जिल्हा
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 10 लाख 25 हजार 448 रुग्णांपैकी 9 लाख 92 हजार 471 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 15 हजार 826 आहे. कोरोनाबाधित एकूण 17 हजार 151 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.67 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 96.78 टक्के आहे.

Img 20210610 wa0002

सातारा जिल्हा
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 76 हजार 663 रुग्णांपैकी 1 लाख 58 हजार 147 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 15 हजार 81 आहे. कोरोनाबाधित एकूण 3 हजार 435 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Img 20210610 wa0007

सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 15 लाख 5 हजार 498 रुग्णांपैकी 1 लाख 48 हजार 38 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 302 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 158 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Img 20210609 wa0021

सांगली जिल्हा
सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 25 हजार 536 रुग्णांपैकी 1 लाख 12 हजार 764 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 9 हजार 150आहे. कोरोनाबाधित एकूण 3 हजार 622 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Img 20210610 wa0008

कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 25 हजार 274 रुग्णांपैकी 1 लाख 8 हजार 508 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 12 हजार 768 आहे. कोरोनाबाधित एकूण 3 हजार 998 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 4 हजार 881 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 1 हजार 234, सातारा जिल्ह्यात 875, सोलापूर जिल्ह्यात 398, सांगली जिल्ह्यात 921 तर कोल्हापूर जिल्ह्यात 1 हजार 453 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 9 हजार 122 आहे. पुणे जिल्हयामध्ये 2 हजार 453, सातारा जिल्हयामध्ये 2 हजार 545, सोलापूर जिल्हयामध् 739 , सांगली जिल्हयामध्ये 1 हजार 210 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 2 हजार 175 रुग्णांचा समावेश आहे.

Img 20210610 wa0006

पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 92 लाख 64 हजार 749 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 16 लाख 8 हजार 419 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

Img 20210610 wa0107

पुणे विभागातील लसीकरण
आजपर्यंत पुणे जिल्हयात 29 लाख 1 हजार 848, सातारा जिल्हयात 7 लाख 71 हजार 631, सोलापूर जिल्हयात 5 लाख 97 हजार 495, सांगली जिल्हयात 7 लाख 28 हजार 324 व कोल्हापूर जिल्हयात 11 लाख 89 हजार 799 इतक्या नागरिकांचे लसीकरण झालेले आहे.
(टिप :- दि. 8 जून 2021 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार)

Img 20210610 wa0013

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये