गुरूवारी दुरुस्तीच्या कामामुळे कोथरूड, वारजे, बावधन भागातील पाणीपुरवठा बंद राहणार

पुणे: उद्या गुरुवार दिनांक २९/१२/२०२२ रोजी वारजे जलकेंद्राचे अखत्यारीतील गांधी भवन टाकी वरील कोथरूड परिसर व चांदणी चौक (चौकोनी) टाकी वरील बावधन परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य पाण्याच्या लाईनला फ्लो मीटर बसविण्याचे नियोजन असल्यामुळे पाणीपुरवठा बंद राहणार आहे व शुक्रवार दि. ३०/१२/२०२२ रोजी सकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.
पाणी पुरवठा बंद असणारा भाग :-
१) वारजे जलकेंद्र अखत्यारीतील गांधी भवन टाकीवरील कोथरूड परिसर :- महात्मा सोसायटी
परिसर, भुजबळ टाऊनशिप, एकलव्य कॉलेज परिसर, कुमार परिसर, गणंजय सोसायटी, रोहन गार्डन परिसर,
कोथरूड वॉर्ड ऑफिस परिसर, अथर्व वेद, कांचन गंगा, अलकनंदा, शिवप्रभा मंत्री पार्क-१, आरोह सोसायटी,
श्रावणधारा झोपडपट्टी, सहजानंद (पार्ट), शांतीबन गांधी स्मारक, किर्लोस्कर डीझेल कंपनी, लक्ष्मीनगर
झोपडपट्टी, प्रमतेश सोसायटी, डी.पी. रोड वरील भाग,
२) वारजे जलकेंद्र अखत्यारीतील चांदणी चौक (चौकोनी) टाकीवरील बावधन परिसर :- बावधन,
गावठाण, बावधन खुर्द, बावधन बुद्रुक, वैदेही एनक्लेव्ह सोसा., विद्यान नगर, पाषाण रोड वरील डावा, उजवा
भाग.




