पुणे शहर

अविनाश भोसलेंना ED ची पुण्यातली मालमत्ता रिकामी करण्याची नोटीस

पुणे : प्रसिद्ध व्यावसायिक अविनाश भोसले यांच्या अडचणीत आता आणखी वाढ झाली आहे. सीबीआयने त्यांना अटक केल्यानंतर आता ईडीनेही कारवाईची नोटीस बजावली आहे. या नोटिशीत त्यांना त्यांची पुण्यातली मालमत्ता रिकामी करण्यास सांगितलं आहे. गेल्या वर्षी मनी लाँडरिंग प्रकरणात ही मालमत्ता ईडीने जप्त केली होती.

Img 20220518 wa00135092505186750304354 2

अविनाश भोसलेंना (Avinash Bhosale) सीबीआय़ने अटक केली असून त्यांना ८ जूनपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यातच आता ईडीने ही नोटीस बजावली आहे. मनी लाँडरिंग प्रकरणाव्यतिरिक्त ईडीने फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट कायद्याच्या उल्लंघनाच्या आरोपाखाली त्यांची चौकशी केली होती. तर येस बँक- डीएचएफएल घोटाळ्याप्रकरणी (Yes Bank – DHFL Scam) त्यांना सीबीआयने तपासासाठी दिल्लीला नेलं असून ८ जूनपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे.

अविनाश भोसले हे पतंगराव कदमांचे व्याही असून मंत्री विश्वजित कदम यांचे सासरे आहेत. ते पुण्यातले प्रसिद्ध उद्योगपती आहेत. पुण्यातल्या बाणेर भागात त्यांचं आलिशान घर आहे. त्यांच्याकडे तीन हेलिकॉप्टर्स आहेत, तसंच घरावर हेलिपॅडही आहेत. विविध नेत्यांना ते हेलिकॉप्टर्स भाड्यानेही देत असतात.

Img 20220521 wa0000

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये