पुणे विद्यापीठात सावित्रीबाई फुले यांचे स्मारक उभारण्यासाठी प्रयत्न सुरू– अन्न, नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सावित्रीबाई फुले यांचे स्मारक व्हावे यासाठी आमचे प्रयत्न सुरू असून यासंदर्भात राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या सोबत मी लवकरच चर्चा करणार आहे. असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. ९४ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांच्या भेटीसाठी पुण्यात आले असताना भुजबळ पत्रकारांशी बोलत होते… Efforts underway to erect a memorial of Savitribai Phule at Pune University – Food, Civil Supplies Minister Chhagan Bhujbal
नाशिकमध्ये होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांच्या पुणे येथील निवासस्थानी जाऊन त्यांना संमेलनाचे निमंत्रण दिले. यावेळी डॉ. नारळीकर यांच्या सुविद्य पत्नी सौ. मंगला नारळीकर, लोकहितवादी मंडळाचे जयप्रकाश जातेगावकर, संजय करंजकर, मुकुंद कुलकर्णी, दिलीप साळवेकर आदी उपस्थित होते

सुमारे पाच दशकाहून अधिक काळ डॉ.जयंत नारळीकर यांच्या लेखनाने मराठी वाचकांना केवळ जगाचेच नव्हे, तर ब्रह्मांडाचे ज्ञान दिले. विज्ञानसाक्षर करणारी, माहिती देणारी असंख्य पुस्तके असतात. परंतु विज्ञानाला मानवी जगण्याचे नवे तत्त्व देऊन वाचकांना वैचारिक दिशा देण्याचे महत्त्वाचे काम डॉ.नारळीकर यांच्या साहित्याने केले आहे. आपल्यासारखा विचारवंत आणि विज्ञानवादी साहित्यिक या संमेलनाला अध्यक्ष म्हणून लाभल्याने ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मराठी साहित्य विचाराला नवा आयाम देणारे ठरेल असा विश्वास भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केला.
आम्ही सर्व नाशिककर आपल्या स्वागतासाठी अतिशय उत्सुक आहोत. आपल्या पत्नी सौ. मंगलाताई यांच्यासह आपणास संमेलनासाठी आमंत्रित करीत आहोत. नाशिकमध्ये आम्ही आपल्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत असल्याचे भुजबळ यांनी म्हंटले आहे.






