गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झालेल्या वारजे माळवाडीतील रहिवाशी विजया खाडे यांचा श्रीमंत राजयोग गणेश मंडळाच्या वतीने सन्मान

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते सन्मान
वारजे : सुईने विणकामातील (क्रोषाचे पौंचो)कौशल्याबाबत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाकेल्या वारजे माळवाडीतील रहिवाशी विजया खाडे यांचा श्रीमंत राजयोग गणेश मंडळाचे वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष, खासदार सुनिल तटकरे व महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी मंडळाचे संस्थापक शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष बाबा धुमाळ, माजी विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, माजी नगरसेविका सायली वांजळे, मंडळाचे अध्यक्ष प्रसाद वागदरे, उपाध्यक्ष संदेश कोंडे, कार्याध्यक्ष ओंकार हिंगणे तसेच मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व परिसरातील नागरिक उपस्थित होते.
वारजे माळवाडी पॉप्युलर नगर येथे राहणाऱ्या विजया खाडे यांनी महिला सहकारी सोबत घेऊन 2720 क्रोशाचे पोंचा ( सुईने केलेले विणकाम ) तयार करून गोरगरीब महिलांना मोफत वाटप केले. या कामाची दखल ग्रिनिज बुक ऑफ रेकॉर्ड ने घेतली व त्यांना सर्टिफिकेट दिले. विजया खाडे यांनी गीता आणि दासबोध मोडी लिपी मध्ये लिहून व ज्ञानेश्वरी मराठी मध्ये लिहून त्याचे पुस्तक तयार केले आहे. त्याबद्दल बाबासाहेब पुरंदरे यांनीही खाडे यांना पुस्तकावर सही देऊन शाबासकी दिली होती. खाडे यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत खाडे यांचा सन्मान करण्यात आल्याचे बाबा धुमाळ यांनी सांगितले.
यावेळी मंडळाच्या गणरायाची आरती सुनील तटकरे यांच्या हस्ते करण्यात आली. या वर्षी मंडळाने फुलांची आकर्षक सजावट केली आहे. मंडळ सातत्याने राबवत असलेल्या सामाजिक उपक्रमामुळे दगडूशेठ हलवाई गणपती, सकाळ, लोकमत, पुणे महापालिका यांच्याकडून घेण्यात आलेल्या स्पर्धांमध्ये मंडळाला कायम पारितोषिके मिळत आलेली आहेत. दरवर्षी मंडळाच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताह, रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, गरजूंना विविध उपक्रमांतून मदत असे उपक्रम सातत्याने घेतले जात असल्याचे मंडळाचे संस्थापक बाबा धुमाळ यांनी सांगितले.
दरवर्षी मंडळाच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताह, रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, गरजूंना विविध उपक्रमांतून मदत असे उपक्रम सातत्याने घेतले जात असल्याचे मंडळाचे संस्थापक बाबा धुमाळ यांनी सांगितले.













