पुणे शहर

पुण्यात मदर सपोर्ट ग्रुपची स्थापना ; २४ डिसेंबरला होणार कार्यशाळा

पुणे : वंध्यत्वावरील उपचारानंतर प्रसूती, प्रसूती नैसर्गिक की सिझेरियन, बाळाला दूध पाजताना येणाऱ्या अडचणी आणि डिलिव्हरीनंतर येणारे नैराश्य यासारख्या विविध प्रश्नांबाबत मातांना मार्गदर्शन करण्यासाठी उमरजी मदर अँड चाईल्ड केअर हॉस्पिटलच्या पुढाकाराने मदर सपोर्ट ग्रुप स्थापन करण्यात आला आहे.

येत्या शनिवारी (दि.२४ डिसेंबर) पुण्यातील बोट क्लब येथे सकाळी दहा ते दुपारी एक वाजेदरम्यान या सपोर्ट ग्रुपची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये विविध वर्गातील मातांना प्रसूती पूर्व आणि प्रसूतीनंतर नेमकी कोणती काळजी घ्यावी यासाठी मातांचा सपोर्ट ग्रुप तसेच स्त्री रोग तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.

Img 20221126 wa02126927299965323449855

उमरजी मदर अँड चाईल्ड केअर हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. चिन्मय उमरजी यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, ‘वंध्यत्वावरील उपचारानंतर त्यांची प्रसूती कशा पद्धतीने असते. त्यांची काही आव्हाने आहेत का? त्यांना कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी लागते यासंदर्भात २३ डिसेंबरला स्त्री रोग तज्ज्ञांशी चर्चा केली जाणार आहे. त्याशिवाय २४ डिसेंबरला (शनिवारी) विविध समस्यांना सामोरे गेलेल्या मातांचा सपोर्ट ग्रुप आहेत. त्या चार प्रकारच्या मदर सपोर्ट ग्रुपची कार्यशाळा आयोजित केली आहे. त्यामध्ये सुमारे ५० महिला सहभागी होणार आहेत.

नवी दिल्लीचे ज्येष्ठ रेडिओलॉजिस्ट डॉ. अशोक खुराना आणि ज्येष्ठ स्त्री रोग तज्ज्ञ आणि हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. मुक्ता उमरजी यावेळी मातांना मार्गदर्शन करणार आहेत.’ डॉ. उमरजी म्हणाले, ‘सध्या चार प्रकारच्या मदर्सचा सपोर्ट ग्रुप आहे. त्यामध्ये आई आणि बाळामध्ये काही दोष असल्यास त्यांच्या आजाराचे निदान करण्याचे मोठे आव्हान होते. आता उपचारानंतर आई आणि बाळ सुखरुप आहेत. त्या दोघांचे ही सुरळीत सुरु आहे अशा मातांचा पहिला ग्रुप. दुसऱ्या गटात डिलिव्हरीनंतर बाळासह आईची कोणती काळजी घेतली पाहिजे. कोणत्या गोष्टी करायच्या तसेच डिलिव्हरीनंतर नैराश्य येते किंवा बाळाला दूध पाजताना काही अडचणी येतात अशा महिलांचा समावेश आहे. या समस्यांना तोंड दिलेल्या महिला दुसऱ्या मातांना मार्गदर्शन करणार आहेत. ‘बस्टिंग द मिथ्य्स’ म्हणजे प्रसूतीबाबत काही गैरसमज आहेत. त्यात नाळ असेल किंवा बाळाने पोटात शी केली तर सिझर करायला हवे, छोटे बाळ आहे तर सिझर करावे लागेल किंवा बाळाच्या हृदयात जन्मजात दोष आहे तर ते टर्मिनेट करायला हवे अशा प्रकारच्या छोट्या छोट्या गोष्टींबाबत गैरसमज आहेत. त्यांचा एक सपोर्ट ग्रुप आहे.

त्याशिवाय नैसर्गिक जन्म सहज शक्य असतो. अशा वर्गातील महिलांना गर्भधारणेसाठी फारसे काही उपचार करावे लागत नाही अशा चार प्रकारच्या मातांचा सपोर्ट ग्रुप आहे. त्याशिवाय या कार्यशाळेत जुळ्या बाळांच्या जन्माबाबत काही गुंतागुंत निर्माण होते. त्या गुंतागुंतीनंतर काय काळजी घ्यावी याबाबतही या कार्यशाळेत मार्गदर्शन केले जाणार आहे. सर्व वर्गातील महिला आपला आलेला अनुभव शेअर करणार आहेत. तसेच सध्या समस्यांना तोंड देणाऱ्या महिला रुग्णांना मार्गदर्शन करणार आहेत, असेही डॉ. उमरजी यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये