कोथरूड मधील कर्वे पुतळा चौकातील पेट्रोल पंपावर स्फोट : नागरिकांची धावपळ

कोथरूड : कोथरूड मधील कर्वे पुतळा चौकात असणाऱ्या लोढा पेट्रोल पंपावर अचानक स्फोट झाल्याने अचानक गोंधळ उडाला आणि पेट्रोल भरण्यासाठी पंपावर असणाऱ्या नागरिकांची एकच धावपळ उडाली. आज दुपारी १ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पंपावरच्या कर्मचाऱ्यांनी परिस्थिती हतळल्याने दुर्घटना टळली.
आज दुपारी कर्वे पुतळा चौकात असणाऱ्या हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या पंपावर हा प्रकार घडला. स्फोटाचा आवाज एवढा मोठा होता की आजूबाजूचा परिसर दणाणून गेला. स्फोट झाला त्यावेळी पंपावर एक पेट्रोल ने भरलेला टँकर उभा होता. तो तातडीने बाहेर काढण्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली असल्याचे बोलले जात आहे.
स्फोट झाल्यानंतर पंपावर एकच बघ्यांची गर्दी झाली होती. पंपावरील टँकर मध्ये पेट्रोल भरत असताना इअर पकडल्याने हा प्रकार घडल्याचे प्राथमिक माहिती मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच कोथरूड आग्नशमक दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी परिस्थीची पाहणी केली. गर्दीच्या चौकात हा प्रकार घडल्याने पंपावारील सुरक्ष तेचा विषय एरणीवर आला आहे.

























