महाराष्ट्र

मुंबई-पुणे रेल्वे सेवा दोन दिवसांसाठी ठप्प, सर्व गाड्या रद्द

पुणे : राज्यभरात मुसळधार पाऊस कोसळतोय. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगावसह राज्यभरात पाऊस प्रचंड पडतोय. या पावसाचा रेल्वे वाहतुकीला खूप मोठा फटका बसला आहे.

कर्जत, अंबरनाथ, बदलापूर येथे रेल्वे रुळावर पाणी साचल्याने मुंबईच्या दिशेला जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. ही वाहतूक अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली आहे. याशिवाय पाऊसही थांबण्याचं नाव घेताना दिसत नाहीय. त्यामुळे चाकरमान्यांचे प्रचंड हाल होत आहेत. कल्याण रेल्वे स्थानकावर पावसामुळे तांत्रिक बिघाड झाला आहे. त्यामुळे कल्याण ते कसारा रेल्वे मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झालीय. सध्या मुंबई ते डोंबिवली अशी रेल्वे वाहतूक धिम्या गतीने सुरु आहे. पण डोंबिवलीच्या पुढे डाऊन मार्गाला मोठा खोळंबा झाला आहे.

Img 20221228 wa00016208176808646242256

विशेष म्हणजे मुसळधार पावसामुळे पुणे-मुंबई रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झालीय. मुंबईत सतत पडत असणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबई-पुणे-मुंबई रेल्वे मार्गावरील रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प पडली आहे. त्यामुळे पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या आणि मुंबईहून पुण्याला येणाऱ्या सर्व रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत.


रेल्वे रुळ पाण्याखाली गेले असल्याने रेल्वे प्रशासनाने याबाबतचा मोठा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे उद्या गुरुवारी देखील या मार्गावरील रेल्वे सेवा बंद राहणार असल्याचे रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात आलं आहे.

Img 20230707 wa00097391429386569165714

पुणे-मुंबई-पुणे मार्गावरील डेक्कन क्वीन, सिंहगड, डेक्कन, इंटरसिटी या रेल्वे उद्या देखील रद्द राहणार आहेत. पुण्यामार्गे जाणाऱ्या तसेच मुंबईतून येणाऱ्या सर्व रेल्वे आज आणि उद्या रद्द राहणार आहेत, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Img 20230708 wa0003
Img 20230511 wa0002281296351682306326034196

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये