पुणे शहर

सलील कुलकर्णी आणि संदीप खरेंच्या ‘आयुष्यावर बोलू काही’ कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

माजी नगरसेवक दीपक पोटे यांच्या वतीने आयोजन 

पुणे :  प्रसिद्ध संगीतकार सलील कुलकर्णी आणि कवी-गायक संदीप खरे यांच्या बहारदार ‘आयुष्यावर बोलू काही’ कार्यक्रमाने पुण्यातील रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक दीपक पोटे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

कार्यक्रमाला उपस्थित रसिकांनी उत्स्फूर्त टाळ्यांच्या गजरात कलाकारांचे कौतुक केले आणि कार्यक्रम यशस्वी ठरला.कार्यक्रमाच्या व्यासपीठावर राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ, आमदार हेमंत रासने, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, भाजप शहर अध्यक्ष धीरज घाटे आणि आयोजक दीपक पोटे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

Fb img 17620776420884188237802217418510

 मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, “सलील कुलकर्णी आणि संदीप खरे यांचा हा कार्यक्रम आयुष्याच्या विविध पैलूंना स्पर्श करतो आणि युवा पिढीला प्रेरणा देतो. या कार्यक्रमासाठी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले, “संगीत आणि कविता यांचा हा अनोखा संगम पुण्याच्या सांस्कृतिक वारशाला उजागर करतो. मोहोळ यांनी कलाकारांना शुभेच्छा दिल्या.

‘आयुष्यावर बोलू काही’ हा कार्यक्रम सलील कुलकर्णी यांच्या मधुर संगीत रचनेने आणि संदीप खरे यांच्या काव्यात्मक गीतांमुळे नेहमीच लोकप्रिय ठरला.यावेळीही कलाकारांनी आयुष्य, प्रेम, संघर्ष आणि आनंद यावर आधारित गीतांचा बहारदार मेळ सादर केला. 

Fb img 17632777615613125350397974993332

कार्यक्रमाचे आयोजक आणि माजी नगरसेवक दीपक पोटे यांनी सांगितले की, पुण्यातील सांस्कृतिक वातावरण समृद्ध करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता. रसिकांचा हा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून आम्हाला खूप आनंद झाला. भविष्यात असे आणखी उपक्रम घेण्याचा मानस आहे.अशा कार्यक्रमांमुळे समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. हा कार्यक्रम पुण्यातील सांस्कृतिक क्षेत्रातील हा एक मैलाचा दगड ठरला असून, रसिकांना आयुष्याच्या गोड-कडू अनुभवांवर ऐकण्याची संधी मिळाली.

Img 20250508 wa00015038950216212096978

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये