पुण्यात रंगला ‘फॅशियोना पुणे 2022’ चा ग्रँड इव्हेंट

पुणे : फॅशन शो म्हटलं की मंत्रमुग्ध करणारं वातावरण. हेच वातावरण आणि हाच जल्लोष पुणेकरांनी नुकताच अनुभवला. अभिनेत्री ऋतुजा लिमये क्रिएशन्स, अभिनेता हृषिकेश पाटील व फ्लाईंग ड्रॅगन एंटरटेनमेंटने नवोदित आणि अनुभवी अशा सर्व मॉडेल्सना फॅशियोना पुणे 2022 हे व्यासपीठ यासाठी उपलब्ध करून दिलं. साधारण दोन महिन्यांपूर्वी सुरू झालेला हा चमचमत्या ताऱ्यांचा प्रवास ग्रँड इव्हेंटद्वारे पार पडला.

किड्सपासून ते सर्व वयोगटासाठी हा फॅशन शो व स्पर्धा पुण्यातील शाहिर आण्णाभाऊ साठे नाट्यगृहामध्ये जल्लोषात पार पडली. मिस, मिसेस, मिस्टर आणि किड्स या विभागांमध्ये ही स्पर्धा व फॅशन शो घेण्यात आला. उ्दयोन्मुख अभिनेत्री ऋतुजा लिमये आणि अभिनेता हृषिकेश पाटील यांनी फॅशन शोची धुरा उत्तमरित्या सांभाळली. किड्सचे परफॉर्मन्स तर जबरदस्त होतेच, मात्र, मिसेसनेही सर्वाचं लक्ष वेधुन घेतलं आणि मिसचा परफॉर्मन्स तर ‘मीस’ करू नये असाच होता तर, मिस्टरही रूबाबदारपणे वावरले. विजेता, द्वितीय आणि तृतीय अशा गटात बक्षिसे देण्यात आली. पहिला, दुसरा व तिसरा असे असले तरी ऋतुजा लिमये आणि हृषिकेश पाटील यांनी पहिल्या दिवसापासून सर्व सहभागी मॉडेल्सना विजेते घोषित केलं होतं. क्रमांक ही फक्त औपचारिकता असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. सर्व मॉडेल्सचे परफॉर्मन्स वाखाणण्याजोगे होते, कोणीही कमी नाही की जास्त नाही. सर्वजण सरस होते आणि या कार्यक्रमाचे हेच श्रेय आहे. अगदी खेळीमेळीच्या वातावरणात हा कार्यक्रम पार पडला.



किड्समध्ये वेदिका देवरेने प्रथम क्रमांक पटकावला, अवनिश आष्टेकर द्वितीय तर मनस्वी गायकवाड तिसरी ठरली. मिस फॅशियोना पुणे 2022 तन्मयी वैद्य ठरली. गायत्री हडवळेने द्वितीय तर तृतीय क्रमांक दिया जाधवने पटकावला. मिस्टर कॅटॅगरीमध्ये अभिषेक माने प्रथम, साकेत लेनकर द्वितीय, अश्विन कल्याणकर तृतीय आले. तर मिसेस फॅशइयोना पुणे 2022 ठरल्या पुर्वा गायकवाड, द्वितीय अमृता शिंदे, अमृता खेडेकर तृतीय क्रमांकावर आहेत. पुजा वाघ, प्रसाद खैरे आणि प्रियांका मिसाळ यांनी परिक्षकाची भूमिका पार पाडली.
मराठी तारे-तारकांची उपस्थिती
या कार्यक्रमाची शोभा मराठी सिनेसृष्टीतील तारे तारकांनी वाढवली. अभिनेता पुष्कर जोग, तेजस बर्वे, अशोक देसाई, स्वनंद बर्वे, अभिनेत्री काजल काटे, गायत्री चित्रे यांनी कार्यक्रमाची रंगत वाढवत जबरदस्त रॅम्पवॉक केला.
मराठीतील पहिला ओटीटी प्लॅटफॉर्म ‘प्लॅनेट मराठी’च्या युट्यूब वाहिनीवर हा लाईव्ह दाखवण्यात आला. वेशभूषेसाठी जेड ब्ल्यू, युराझ्ले, क्लॅरिटा बुटीक, अनुराजटी यांचे सहकार्य लाभले. डिजिटलसाठी स्टुडिओ कोऑर्डिनेटर, टॅलेंट स्काऊट स्टुडिओ स्टुडिओ पार्टनर होते. पिअर्ली सलून ॲण्ड इन्स्टिट्युट आणि गोल्डन ऑरेंज एंटरटेनमेंट हे प्रायोजक होते. आनंद सुतार व टीम, प्रतिक सोनवणे, साहिल यांनी छायाचित्रणाची बाजू सांभाळली. न्याहारी कावेरी उपहारगृहाकडून देण्यात आली होती. क्लब महिंद्रा हॉलिडेज्, सुयोग व्हेंचर्स हे प्रायोजक होते.
अभिनेत्री व फॅशियोना पुणे 2022 च्या आयोजक ऋतुजा लिमये म्हणाल्या की,”मला स्वतःला विश्वास बसत नाहीये कि मी फक्त पंचवीस वर्षाच्या वयामध्ये इतका मोठा इव्हेंट ऑर्गनाइज करतीये” “मराठी इंडस्ट्री मधले इतके मोठे सेलिब्रिटीज फक्त माझ्या प्रेमापोटी माझ्या एका शब्दावर शो अटेंड करण्यासाठी आले याचा मला खूप आनंद वाटतो आणि समाधान ही वाटतं.”
अभिनेता व फॅशियोना पुणे 2022 चे आयोजक
हृषिकेश पाटील म्हणाले की, “फॅशन शो ऑर्गनाईज करताना मनात आधी थोडीशी भीती होती की आपण कधीच फॅशन शो केला नाहीये पण मला या गोष्टीचा आनंद वाटतोय की आम्ही फॅशियोना, पुणे 2022 हा इव्हेंट सक्सेसफुली ऑर्गनाइज करू शकलो.”
किड्स कॅटेगरीमध्ये परीश भिडे, अविरा गुरव, अवनीश आष्टेकर, अद्या साळुंखे, शिव अष्टेकर, वैदेही म्हस्के, रीआन देडगे, मनस्वी गायकवाड, सागरिका नाईक, आरूशी सोनवलकर, रितीशा ढमाले, वेदिका डेरे, फाल्गुनी चौधरी, दीया राजू, रेया राजू, साची निकाळजे, आराध्या देशमुख सहभागी झाले होते.
मिस कॅटॅगरीमध्ये तन्मयी वैद्य, सन्चाली मंडरेवाल, तनिशा अगरवाल, प्रियांका बोन्डवे, गायत्री हाडवळे, वृशाली मालवडकर, शिल्पा गरजे, पुजा शर्मा, लिशा बोर्डीया, रेखा परियार, आकांक्षा कांबळे, ज्योत्सना वाळेकर, अंकिता आम्टे, वैशाली पाटील, देवयानी गवांदे, स्वाती अरवाडे, उन्नती साळवी, श्रेया जाधव, रुतुजा दीक्षित, अंजली सुराडकर, श्रेयसी वान्गीकर, दीया जाधव, पल्लवी गरड, अस्मिता राठोड हे सहभागी झाले होते.
मिसेस कॅटेगरीतील जान्हवी भिडे, तन्वी जाधव, अमृता शिंदे, पुर्वा गायकवास, प्रिती जयस्वाल, प्रियांका पवार, किरण काळे, पुजा चव्हाण, डिम्पी राजकुंवर, प्राची काणे, पुनम जानकर, अमृता खेडेकर, प्रिती दराडे, दीपिका गांधी, मिस्टर कॅटेगरीमध्ये नाशिक स्मार्ट सिटीचे माजी जनसंपर्क अधिकारी व पत्रकार प्रशांत चिडे, राजहंस गोडसे, साईप्रसाद दसरवार, साकेत लोनकर, अभिषेक माने, दत्तात्रय सोनवलकर, अश्विन कल्याणकर, तुषार दराडे, रोहित कामत, साईनाथ सुकळे, केशव गोरखे, बिस्वजीत दत्ता, रॉन बुरचेट सहभागी झाले होते.






