पुणे महापालिका निवडणूक :पाषाण- सुतारवाडी, सुस- महाळुंगे,बाणेर- बालेवाडी,औंध भागात काटे की टक्कर…

प्रभाग क्रमांक ११, १२,१३,१४ आरक्षण सोडत जाहिर.
पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या आरक्षणाची सोडत आज मंगळवारी स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे काढण्यात आली.ओबीसी आरक्षण शिवाय हि सोडत झाली आहे. या मध्ये प्रभाग क्रमांक ११,१२,१३,१४ मधील आरक्षण पुढील प्रमाणे.
प्रभाग क्रमांक ११ : (अ) अनुसुचीत जाती – पुरुष, (ब) महिला, (क) सर्वसाधारण
बोपोडी, पुणे विद्यापीठ, दापोडी औंध रोड परिसराचा समावेश असलेल्या या परिसरामध्ये माजी उपमहापौर सुनिता वाडेकर व भाजपाचे सचिव सुनील माने हे तिकिटांसाठी एकमेका च्या समोर येणार असून सर्वसाधारण महिला पुरुष व अनुसूचित जाती सर्वसाधारण अशी प्रभागाची रचना झाल्याने माजी नगरसेवक बंडू ढोरे माजी नगरसेवक श्रीकांत पाटील माजी नगरसेवक आनंद छाजेड तसेच काँग्रेसचे नेते मनीष आनंद हे प्रमुख इच्छुक रिंगणात असल्याने तिकीट मिळवण्या पासूनच ते महा विकास आघाडीच्या वाटाघाटी निर्माण पुण्यापर्यंत स्पर्धेत रंगात पाहायला मिळणार आहे.
प्रभाग क्रमांक १२ : (अ) अनुसुचीत जाती – पुरुष, (ब) महिला, (क) सर्वसाधारण
औंध बालेवाडी व बाणेर चा निम्म्याहून अधिक भाग असलेला हा प्रभाग संमिश्र असून या प्रभागांमध्ये भाजपाचे 12 उमेदवार तीन जागांसाठी इच्छुक आहेत. माजी नगरसेवक अमोल बालवडकर माजी नगरसेविका स्वप्नाली सायकर माजी नगरसेविका अर्चना मधुकर मुसळे, माजी नगरसेविका संगीता गायकवाड, विशाल गांधीले, बाळासाहेब रानवडे, दत्तात्रेय गायकवाड, विकास रानवडे, नितीन रणवरे, लहू बालवडकर, प्रकाश बालवडकर अशा अनेक दिग्गजांची फळी भाजपामध्ये इच्छुक असल्याची दिसते. तर राष्ट्रवादीचे सागर बालवडकर, बाबुराव चांदेरे, विशाल विधाते, शीला भालेराव, अविनाश कांबळे आदी इच्छुक असल्याची चर्चा आहे. तसेच शिवसेनेचे सुशील लोणकर, माजी सरपंच मयुर भांडे, आदी प्रमुख इच्छुक असून काँग्रेस मधून माजी नगरसेवक शिवाजी बांगर माजी नगरसेवक कैलास गायकवाड ,रोहित धेंडे, आदिती गायकवाड, स्नेहल बांगर आदी इच्छुक आहेत. महाविकासआघाडी झाल्यावर जागांचे वाटप कसे होणार यावर अनेकांचे भवितव्य अवलंबून आहे. या प्रभागात आम आदमी पार्टीचे सुदर्शन जगदाळे हे देखील रिंगणात असणार आहेत.

प्रभाग क्रमांक १३ : (अ) महिला खुला (ब) सर्वसाधारण
सुस महाळुंगे व बाणेर समावेश असलेल्या या प्रभागात एक महिला व एक सर्वसाधारण अशी दोनची प्रभाग रचना आहे. पुणे महानगरपालिकेत गाव समाविष्ट होण्याअगोदर या गावांमध्ये दोनही शिवसेनेचे सरपंच होते तसेच लोकसभा व विधानसभेत ला सर्वाधिक मतदान शिवसेनेला करणारी गावे म्हणून ही गावे परिचित आहेत. या प्रभागात शिवसेनेचे उपशहर प्रमुख राजेंद्र धनकुडे, मयुर भांडे, उपशहर संघटिका ज्योती चांदेरे, डॉक्टर दिलीप मुरकुटे, लीना गणेश मुरकुटे, रोहिणी धनकुडे, नारायण चांदेरे आधी इच्छुक उमेदवार आहेत. तर काँग्रेसचे स्नेहल बांगर, जीवन चाकणकर इच्छुक असून राष्ट्रवादी पक्षाचे माजी नगरसेविका रंजना मुरकुटे, माजी नगरसेवक बाबुराव चांदेरे, समीर चांदेरे पुनम विधाते, नितीन कळमकर इच्छुक आहेत. आम आदमी पार्टीचे आबासाहेब कांबळे तर भाजपाचे अमोल बालवडकर, लहू बालवडकर , गणेश कळमकर, ज्योती कळमकर, आदी इच्छुक आहेत. या प्रभागांमध्ये परिसरातील सोसायट्यांनी देखील आपला प्रतिनिधी रिंगणात उतरवण्याची तयारी दर्शवली आहे.
प्रभाग क्रमांक १४ : (अ) अनुसूचित जमाती सर्वसाधारण, (ब) महिला खुला, (क) सर्वसाधारण.
पाषाण सुतारवाडी सोमेश्वर वाडी बावधन लमाण तांडा परिसराचा समावेश असलेल्या या प्रभागांमध्ये राष्ट्रवादी पक्षाकडून सूर्यकांत भुंडे, माजी नगरसेविका सुषमा निम्हण, माजी नगरसेवक प्रमोद निम्हण,माजी नगरसेविका रोहिणी चिमटे, दीपक दगडे, अभिजीत दगडे आधी इच्छुक उमेदवार आहेत.
तर भाजपा कडून माजी सरपंच पियुषा दगडे माजी नगरसेवक किरण दगडे राहुल कोकाटे, रोहन कोकाटे, सचिन दळवी, शिवम सुतार , सचिन पाषाणकर आदी इच्छुक उमेदवार आहेत. तर शिवसेनेकडून विभाग प्रमुख संतोष तोंडे, महेश सुतार, संजय निम्हण आधी उमेदवार इच्छुक आहेत.
तर काँग्रेस मधून माजी नगरसेवक तानाजी निम्हण, दत्ता जाधव, मंगेश निम्हण, मृणाल निम्हण आधी उमेदवार इच्छुक आहेत.
आरक्षण जाहीर झाल्यानंतर या प्रभागांमध्ये कोण कुणा समोर येणार याची चर्चा रंगू लागली आहे. प्रभाग रचना बदला पासूनच समोरा समोर न येण्यासाठी प्रयत्न करणारे उमेदवार हे एकमेका समोर येणार का याची उत्सुकता निर्माण झाली आहे.


