महाराष्ट्र

मुश्रीफांची सवय “आ बैल मुझे मार” – चंद्रकांत पाटील

महाराष्ट्रात काही घडले की मुख्यमंत्री यांना काही म्हणायचे
नसते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष जयंतराव पाटीलांना यांना काही म्हणायचे नसते लगेचच मुश्रीफांना म्हणायचे असते निष्ठा दाखवण्यासाठी केवढी केविलवाणी धडपड असल्याचा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला.
    पाटील म्हणाले,    2014 ते 2019 बदल्यांमध्ये घोटाळे झाले तर काय झोपा काढत होतात ?  इतक्या उशिरा जाग आल्यामुळे चौकशी करायची तर करा आधी 2020 बदल्यांमधील करा. तुम्ही काही केले नाही तर झोंबंत कशाला ?
ग्रामपंचायतींना प्रशासक, पी एम केअर, सुशांत प्रकरण सगळ्या विषयांमध्ये कोर्टाकडून थपडा खायचे असतील तर कोण काय करणार ?
मी जे म्हणतो ते महाराष्ट्राच्या डी.जी. नी म्हटले आहे. आस्थापना समितीच्या शिफारशींच्या बाहेर मी सह्या करणार नाही.
            सध्या कोल्हापूरात प्रशासन हतबल आहे. कोरोना साहित्य खरेदीत भ्रष्टाचार, रुग्णांना बेड मिळत नाही आहेत, स्वॅब च्या रिपोर्ट मध्ये गोंधळ असा हाहाकार माजल्याच्या बातम्या रोज प्रसार माध्यमातून येत असताना त्याबाबत मा मुश्रीफ साहेब काहीही बोलत नाहीत पण वर घडणा-या गोष्टींवरुन जनतेचे लक्ष विचलीत व्हावे म्हणून अन्य गोष्टींवर बोलायचे हे म्हणजे गिरे तो भी …..असे म्हणल्यातला प्रकार आहे. असे पाटील यांनी पाठवलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये