सांस्कृतिक
सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआय कडे
सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआय कडे सोपवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. याबाबत आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. हा निर्णय म्हणजे राज्य सरकारला धक्का मनाला जात आहे. मात्र या निर्णयाचे राज्य सरकार स्वागत करत असून सीबीआय ला या तपासात लागेल ते सहकार्य केले जाईल. असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून पत्रकार परिषद घेऊन सांगण्यात आला आहे. या प्रकरणातील तपास मुंबई पोलिसांकडून योग्य झाला असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले आहे त्यामुळे देशमुख यांनी मुंबई पोलिसांचे कौतुक केले. या प्रकरणाचा वापर विरोधक राजकारण म्हणून करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या निकालानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी सत्यमेव जयते असे ट्विट केल्याने त्याबाबत आता वेगळीच चर्चा सुरू झाली आहे.
तर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आता राज्य सरकारने आत्मचिंतन करावे असा टोला लगावला आहे. याबाबत परिवहन मंत्री अनिल परब यांनी म्हटले आहे की, आम्हीच सरकार स्थापन करू असे विरोधकांना वाटत होते. मात्र ठाकरे सरकार स्थिर पणे चांगल्या रीतीने काम करत असल्याने विरोधकांच्या पोटात दुखत असून सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचे त्यांच्याकडून केवळ राजकारण केले जात आहे. एकूणच या निकालानंतर आता सीबीआय कोणत्या दिशेने तपास करणार व त्यातून नक्की सत्य काय बाहेर येणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. बिहार च्या निवडणुका आणि महाराष्ट्रातील राजकारण सुशांत प्रकरणावरून ढवळून निघताना दिसत आहे




