बार्टी संस्थेमार्फत आर्थिक सहाय्य योजना

पुणे – डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे मार्फत यु.पी.एस.सी. केंद्रिय सशस्त्र
पोलीस दल (CAPF) मुलाखत परीक्षा (UPSC CAPF – Personality Test Examination) या परीक्षेस पात्र असलेल्या महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीच्या उमेदवारांना मुलाखत परीक्षेच्या तयारीसाठी प्रती विद्यार्थी रक्कम रु. 25,000/- आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे.
दि. 17 एप्रिल 2026 रोजी संघ लोकसेवा आयोगाने केंद्रिय सशस्त्र पोलीस दल (CAPF) मुख्य परीक्षेचा निकाल घोषित केला आहे. सदर निकालानुसार केंद्रिय सशस्त्र पोलीस दल (CAPF) Personality Test Examination करिता पात्र असलेल्या उमेदवारांना एकरकमी रक्कम रु. 25,000/- चे आर्थिक सहाय्य देण्यात येत आहे. त्याबाबत सविस्तर जाहिरात व ऑनलाईन फॉर्म बार्टी संस्थेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. जास्तीत जास्त पात्र उमेदवारांनी सदर योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन बार्टी संस्थेमार्फत करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी- http://barti.maharashtra.gov.in > NOTICE BOARD> UPSC CAPF Assistant Commandant Service – Personality Test Examination 2026 Financial assistance Scheme येथे भेट द्यावी.




