देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड येथे नोकरीची संधी

पुणे : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड येथे (Dehuroad Cantonment Board Recruitment) युवकांसाठी (Youth) नोकरीची संधी (Job opportunity) उपलब्ध झाली आहे. निवासी वैद्यकीय अधिकारी, हिंदी अनुवादक, कर्मचारी परिचारिका, क्ष-किरण तंत्रज्ञ, फार्मसी अधिकारी, सर्वेक्षक कम ड्राफ्ट्समन, उपनिरीक्षक, कनिष्ठ लिपिक कम कंपाउंडर, पेंटर, सुतार, प्लंबर, मेसन, ड्रेसर, माळी, वॉर्ड अय्या, वॉर्ड बॉय, वॉचमन स्वच्छता निरीक्षक, सफाई कर्मचारी या पदांसाठी देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड येथे भरती जाहीर करण्यात आली आहे.
देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड यांनी जारी केलेल्या अधिसूचनेननुसार, एकूण 47 रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. याबाबतची अधिक माहिती आपण अधिकृत वेबसाईट dehuroad.cantt.gov.in वरून जाऊन पाहू शकता. अर्ज करण्याची मुदत 31 जानेवारी 2023 ही आहे. अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. या नोकरीसाठी अर्जदाराचे वय निवासी वैद्यकीय अधिकारी या पदासाठी 23 ते 35 वर्षे इतके असावे. तसेच इतर पदांसाठी 21 ते 30 वर्षे असणे आवश्यक आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे कार्यालय, देहू रोड रेल्वे स्टेशनजवळ, देहूरोड, पुणे – 412101 (महाराष्ट्र) असा आहे. वेबसाईटवर नमूद केलेल्या सर्व कागदपत्रांच्या छायांकित प्रतिसह रीतसर योग्य पध्दतीने भरलेला अर्ज दिलेल्या पत्यावर पाठवायचा आहे. अपूर्ण अर्ज नाकारले जाणार आहेत. त्यामुळे उमेदवारांनी अर्ज नीट भरायचा आहे. इच्छुक उमेदवारांनी आवश्यक माहितीकरिता dehuroad.cantt.gov.in या संकेतस्थळाला भेट दयावी. त्यानंतर तिथे दिलेल्या सुचना वाचून योग्य कागदपत्रांच्या छायांकित प्रतिसह अर्ज 31 जानेवारी 2023 या तारखेपर्यंत पोहोचतील अशा रितीने पाठवायचे आहेत.
पुण्याच्या आसपास उपलब्ध नोकरीच्या संधी जाणून घेण्यासाठी सिंहासन न्यूजच्या संकेतस्थळास नियमित भेट द्या.




