पुणे शहर

कोथरूडमध्ये आगीची घटना; मनसे कार्यकर्त्यांच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली…

कोथरूड : मंगळवारी दुपारी साडे अकराच्या दरम्यान कोथरुडमधील कुंबरे टाऊनशीप येथील साई प्रसाद सोसायटीच्या गेट शेजारील बंद स्थितीत असलेल्या वाॅशिंग सेंटरमध्ये परिसरातील खूप मोठ्या प्रमाणात जमा झालेला कचरा , झाडांचा पालापाचोळा , फांद्या , डहाळ्या सदर सफाई महीला कामगार व तिच्या मुलाने मालकाच्या सांगण्यावरून बेजबाबदारपणाने पेटविला. कचऱ्याचा ढिगारा खूप मोठा असल्याकारणाने आगीने काही मिनिटात रौद्ररूप धारण केले. चारही बाजूला सोसायटी असल्यामुळे परिसरात व प्रत्येक फ्लॅट मध्ये भयंकर धुराचे साम्राज्य निर्माण झाले होते.Fire incident in Kothrud; A big accident was averted due to the attention of MNS workers

नागरिकांना धुराचा नाहक त्रास सहन करावा लागला. रौद्र आगीमुळे धुराचे लोट आकाशात फेकू लागले. या आगीमुळे जवळच लागून असलेल्या विद्युत वाहक डिपी व केबलनेही पेट घेतला. शॉट्सर्किटमुळे परिसरात भितीचे वातावरण तयार झाले. मला याची माहिती मिळताच मनसे शाखाअध्यक्ष विजय पालकर ,  एकदंत फ्रेंड सर्कल ट्रस्टचे कार्याध्यक्ष उमेश जगदाळे व आमचे इतर सहकारी मित्र सदर घटनास्थळी तत्काळ पोहोचले. समोरील भयंकर परिस्थिती पाहून विलंब न करता ताबडतोब अग्निशमन दल , विद्युत पुरवठा विभाग तसेच मनपा आरोग्य विभागला सदर घटनेची माहिती देवून पाचारण केले. अग्निशमन दलाच्या योद्ध्यांनी तत्काळ येवून आग नियंत्रणात आणली.

IMG 20210215 WA0015

पालकर म्हणाले, आग पेटवली तिथे बाजूलाच मोठ्या प्रमाणात चार चाकी वाहने उभी होती. आणखी थोडा उशीर झाला असता तर या छोट्याश्या वाटणाऱ्या चुकीमुळे मोठी दुर्घटना घडली असती. मी अग्निशमन दल , विद्युत पुरवठा विभाग तसेच मनपा आरोग्य विभागच्या अधिकारी योद्ध्यांचे मनपुर्वक आभार मानतो. या सर्व भयंकर परिस्थितीला कारणीभूत असलेल्या सदर व्यक्तींवर दंडात्मक कठोर कारवाई व्हावी.

IMG 20210116 WA0007
IMG 20210128 WA0172
Tags

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये
Close
Close