महाराष्ट्र

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर..

विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार आज जाहीर करण्यात आले.  प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद उमेदवारांची नावे जाहीर केली.  शरद पवार गटाच्या एकूण 45 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली असून यामध्ये बारामती मतदारसंघाचा देखील समावेश आहे. बारामतीमधून  युगेंद्र पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरुद्ध पुतणे युगेंद्र पवार यांच्यात आता थेट लढत बघायला मिळणार आहे.

पुण्यात हडपसर मतदार संघातून प्रशांत जगताप तर वडगाव शेरी मतदार संघातून बापू पठारे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.


जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांची यादी

  • इस्लामपूर – जयंत पाटील
  • काटोल – अनिल देशमुख
  • घनसावंगी – राजेश टोपे
  • कराड उत्तर – बाळासाहेब पाटील
  • मुंब्रा-कळवा – जितेंद्र आव्हाड
  • कोरेगाव – शशिकांत शिंदे
  • बसमत – जयप्रकाश दांडेगावकर
  • जळगाव ग्रामीण – गुलाबराव देवकर
  • इंदापूर – हर्षवर्धन पाटील
  • राहुरी – प्राजक्त तनपुरे
  • शिरुर – अशोक पवार
  • शिराळा – मासिंगराव नाईक
  • विक्रमगड – सुनील भुसारा
  • कर्जत – जामखेड – रोहित पवार
  • अहमदपूर – विनायकराव पाटील
  • सिंदखेडराजा – राजेंद्र शिंगणे
  • उदगीर – सुधाकर भालेराव
  • भोकरदन – चंद्रकांत दानवे
  • तुमसर – चरण वाघमारे
  • किनवट – प्रदीप नाईक
  • जिंतूर – विजय भामरे
  • केज – पृथ्वीराज साठे
  • बेलापूर – संदीप नाईक
  • वडगाव शेरी – बापूसाहेब पठारे
  • जामनेर – दिलीप खोडपे
  • मुक्ताईनगर – रोहिणी खडसे
  • मूर्तिजापूर – सम्राट डोंगरदिवे
  • नागपूर पूर्व – दिनेश्वर पेठे
  • किरोडा – रविकांत गोपचे
  • अहिरी – भाग्यश्री आत्राम
  • बदनापूर – बबलू चौधरी
  • मुरबाड – सुभाष पवार
  • घाटकोपर पूर्व – राखी जाधव
  • आंबेगाव – देवदत्त निकम
  • बारामती – युगेंद्र पवार
  • कोपरगाव – संदीप वरपे
  • शेवगाव – प्रताप ढाकणे
  • पारनेर – राणी लंके
  • आष्टी – मेहबूब शेख
  • करमाळा – नारायण पाटील
  • सोलापूर शहर उत्तर – महेश कोठेे
  • चिपळूण – प्रशांत यादव
  • कागल – समरजीत घाटगे
  • तासगाव -कवठेमहंकाळ – रोहीत पाटील
  • हडपसर – प्रशांत जगताप
Img 20241020 wa00015243193050905147069
Img 20240404 wa0016281291197243699799508498
Img 20240404 wa0013281291032765212350995267
Img 20240404 wa0012281298841886320058264868

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये