फ्लायहाय चॅरिटेबल सोसायटीच्या वतीने कोकणातील ३ हजार कुटुंबांना जीवनावश्यक साहित्य वाटप..

पुणे : फ्लायहाय चॅरिटेबल सोसायटीच्या वतीने व हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड च्या सहकार्याने कोकणातील चिपळूण व आसपासच्या गावांमधील ३००० कुटूंबाना जीवनावश्यक साहित्य वाटप करण्यात आले.
फ्लायहाय चॅरिटेबल सोसायटीच्या अध्यक्षा अभिनेत्री अदिती द्रविड, मंदार बलकवडे, पियुष कुलकर्णी व विनायक द्रविड यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्यात आला. चिपळूण व आसपासच्या गावांमधील पुरामुळे विस्कळीत झालेल्या नागरिकांचे जीवन पूर्वपदावर आणण्यासाठी जीवनावश्यक साहित्य वाटप करण्यात आले आहे.
अदिती द्रविड म्हणाल्या कोकणाची पुरामुळे उद्भवलेली परिस्थिती खुपच भयानक आहे. त्यामुळे अडचणीत आलेल्या नागरिकांना त्यातून बाहेर काढणे गरजेचे आहे. आम्ही फ्लायहाय चॅरिटेबल सोसायटीच्या वतीने व हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड च्या सहकार्याने तेथील ३००० कुटुंबापर्यंत जीवनावश्यक वस्तूंची मदत पोहचवली आहे. ज्या सेवाभावी संस्थांना शक्य आहे आशा संस्थांनी जास्तीत जास्त मदत करण्याचे अहवाहन अदिती द्रविड यांनी केले आहे.
मंदार बलकवडे म्हणाले, पूर परिस्थितीमुळे चिपळूण, महाड परिसरातील लोकांचे जीवन पूर्णपणे कोलमडले आहे. सर्व पूर्वपदावर यायला वेळ लागणार असला तरी त्यातून सावरण्याचा प्रयत्न नागरिक करत आहेत. त्यांना मदतीचा हात म्हणून आम्ही फ्लायहाय चॅरिटेबल सोसायटीच्या माध्यमातून खारीचा वाटा उचलत जीवनावश्यक वस्तूंची मदत पोहचवली आहे.



