पुणे शहर

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयासमोरील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी उपाययोजना करण्याचा निर्णय…

पुणे : Pune city दीनानाथ मंगेशकर रुग्णालयासमोरील रस्ता व रुग्णालयाकडून  गुळवणी महाराज पथाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी उपाययोजना करण्यात यावी यासाठी आज वाहतूक पोलीस अधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी पाहणी केली. Decision to take various measures to solve the traffic problem in front of Dinanath Mangeshkar Hospital

शिक्षण समिती अध्यक्ष नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांच्या पुढाकाराने आजच्या या पाहणीचे नियोजन करण्यात आले होते. यावेळी नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे, वाहतूक पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे, भाजपचे शहर प्रवक्ते संदीप खर्डेकर, प्रभाग सरचिटणीस बाळासाहेब धनवे, सुभाष ढावरे, या समस्येबाबत सतत लढणारे रवी आठवले, रफिकभाई शेख, संगीता आदवडे व स्थानिक नागरिक उपस्थित होते.

दीनानाथ रुग्णालयात येणारे नागरिक आतमध्ये पार्किंग न करता नो पार्किंग चे नियम धुडकावून रस्त्यावर गाड्या लावतात त्यामुळे येथे वाहतूक कोंडी होते, व येथील रहिवाश्यांना स्वतःच्या घरात जाताना देखील अडचणी येतात अशा तक्रारी यावेळी नागरिकांनी केल्या.  याबाबत सातत्याने कारवाई करण्यात येईल, मात्र 24×7 कारवाई करणे शक्य नसल्याचे पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे यांनी यावेळी  स्पष्ट केले.

Img 20210727 wa0218

येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी समोरील गल्लीत 100 मीटर नो पार्किंग चे फलक लावणे व सदर गल्लीत एकेरी वाहतूक प्रस्तावित करण्याबाबत कार्यवाही सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच याबाबत दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या प्रशासनाशी चर्चा करून त्यांनी एक ट्रॅफिक वार्डन नेमावा व त्यांच्या कडे येणाऱ्या नागरिकांना गाड्या आतमधे लावण्याबाबत लोकशिक्षण द्यावे व तसे आवाहन करणारे फलक लावावेत अशी मागणी आग्रहाने मांडणार असल्याचे नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यावेळी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये