राष्ट्रीय

Budget 2022 : ऑनलाइन शिक्षण होणार सोपं; एक क्लास, एक टीव्ही चॅनेल मोहिमेचा विस्तार

नवी दिल्ली : विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारने आपल्या अर्थसंकल्पामध्ये विशेष तरतूद केली आहे. केंद्र सरकारच्या पंतप्रधान ई-विद्या योजनेअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या एक क्लास, एक टीव्ही चॅनेल या मोहिमेचा विस्तार आता करण्यात आला आहे. पूर्वी या मोहिमेअंतर्गत पहिली ते बारावी इयत्तेच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकी एक असे 12 टीव्ही चॅनेल्स सुरू करण्यात आले होते. मात्र आता त्यांची संख्या 100 पर्यंत वाढवण्यात आली आहे. यामुळे प्रत्येक राज्याला आपल्या प्रादेशिक भाषांमध्ये शैक्षणिक कार्यक्रमांची निर्मिती करता येऊ शकेल. ज्याचा जास्तीत जास्त प्रमाणात विद्यार्थी लाभ घेऊ शकतील

Screenshot 2022 01 29 09 52 08 45

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज मांडलेल्या अर्थसंकल्पात कृषी विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात काही सुधारणा करण्याची तरतूद करण्यात आली आहे. नैसर्गिक, झिरो बजेट शेती, सेंद्रिय शेती, आधुनिक शेती यांच्या गरजेनुसार कृषी विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात सुधारणा करण्यासाठी राज्यांना प्रोत्साहन दिलं जाणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये