पुणे श्रमिक पत्रकार संघास प्रेस क्लबसाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल महायुती सरकार, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आभार – माजी उपमहापौर दीपक मानकर

दीपक मानकर यांच्या मागणीला यश
पुणे : पुणे श्रमिक पत्रकार संघ ही पुण्यातील श्रमिक पत्रकारांची स्वातंत्रपूर्व पासुनची संघटना आहे. या संघटनेचे जवळपास पाचशे सभासद आहेत. यामधील अनेक पत्रकार बांधवाना स्वतःची घरे नाहीत. त्यात या पत्रकारांना कमी मानधनात सेवा बजावतात. त्यामुळे त्यांना स्वतःचे हक्काचे घर घेणे शक्य होत नाही. अशा पत्रकारांसाठी पत्रकार नगर नंतर एकही घरकुल योजना झालेली नाही. याउलट मुंबई, ठाणे तसेच नागपूर शहरात शासनाने पुढाकार घेऊन पत्रकारांसाठी घरकुल योजना राबविल्या आहेत. पुण्यातही अशी योजना राबवावी अशी मागणी पत्रकारांकडून सातत्याने होत होती. त्याच अनुषंगाने दीपक मानकर हे पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष असताना पुणे श्रमिक पत्रकार संघटनेचे तत्कालीन अध्यक्ष पांडुरंग सांडभोर आणि सर्व सदस्यांनी पत्रकारांसाठी घरकुल योजना आणि प्रेस क्लबसाठी जागा मिळावी अशी मागणी त्यांच्याकडे केली होती.
त्यावेळी दीपक मानकर यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांना पत्रकारांसाठी घरकुल योजना आणि प्रेस क्लबसाठी जागा मिळावी असे निवेदन दिले होते. त्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पुढील कार्यवाहीबाबतचा ईमेलही प्राप्त झाला होता.
दीपक मानकर म्हणाले,अजितदादा पवार यांनी पत्रकारांच्या मागणीवर सकारात्मक भूमिका घेऊन पुणे शहरातील सेनापती बापट मार्ग येथे प्रेस क्लब साठी जागा उपलब्ध करून दिली. आम्ही केलेल्या मागणीमुळे आता सर्व पत्रकार बांधवांना आता स्वतःचे हक्काचे प्रेस क्लब उपलब्ध होत आहे याचा मनस्वी आनंद होत आहे. महायुती सरकार आणि उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री, अजितदादा पवार यांचे मन:पूर्वक आभार




