पुणे शहर

प्रदूषणमुक्त पुण्यासाठी, टेकडया हेरिटेज म्हणून जाहीर कराव्यात यासाठी पाठपुरावा करणार : चंद्रकांत मोकाटे

कोथरूड : पुणे शहराचे पर्यावरण चांगले राहावे, मुळा मुठा नदी स्वच्छ राहावी, प्रदूषणमुक्त पुणे व्हावे यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे कोथरूड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार व माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांनी रविवारी सांगितले. पुण्यातील टेकडया हेरिटेज म्हणून जाहीर कराव्यात, पुरातत्व खात्याकडे खास टेकड्यांचे संरक्षण करण्यासाठी खास कायदा करावा यासाठी केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी एका शिष्टमंडळाच्या कार्यकर्त्यांना सांगितलं.

वेताळ टेकडी बचाव कृती समिती व पुणे रिव्हर्स रिव्हायल समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी चंद्रकांत मोकाटे यांच्या कोथरूड येथील जनसंपर्क कचेरीत भेट घेऊन पुण्यातल्या पर्यावरण, नदी सुधार योजना आदीविषयी चर्चा केली. या चर्चेत मोकाटे यांच्यासमवेत माजी नगरसेवक प्रशांत बधे, विकास पासलकर, तर स्वयंसेवी संस्थातर्फे प्राजक्ता महाजन, प्रिती पुष्पा प्रकाश, सुनिल काळे, आदी पदाधिकारी सहभागी झाले होते. 

Img 20241110 wa00067470970456700648682
Img 20241020 wa0001435697684176070576

मोकाटे यांनी या सर्व पदाधिकाऱ्यांवर चर्चा करताना सांगितलं की मी पुणे शहराच्या  पर्यावरणाविषयी अतिशय जागरूक आहे. पुणे महापालिकेच्या सर्वसाधारणसभेत व विधिमंडळ अधिवेशनात याविरुद्ध आवाज उठविला आहे. यापुढेही त्यासाठी प्रयत्न करेन असे त्यांनी या शिष्टमंडळास सांगितलं. 

रविवारी सकाळची वेळ साधत पदयात्रेद्वारे नागरिकांशी संवाद..

दरम्यान आज प्रचाराच्या काळात पहिला रविवार असल्यामुळे मोकाटे डहाणूकर कॉलनीत लक्ष्मी नगर, हॅपी कॉलनी, गोसावी वस्ती, मावळे आळी आदी भागातील नागरिकांबरोबर पदयात्रेद्वारे संपर्क साधला. यावेळी नंदू घाटे, पुणे शहर राष्ट्रवादी ( शरद पवार गट ) युवक काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष किशोर कांबळे, योगेश निंबरे, अजय भुवड, जगदीश दिघे, नाना पासलकर, कांता बराटे, अमित थोपटे, मारुती फेंगसे, अमोल पवार आदी या पदयात्रेता सहभागी झाले होते

Img 20240404 wa0016281297658999536660438617
Img 20240404 wa0013281298602993728148316202

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये